” स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ” निमित्त भव्य प्रभात फेरी चे आयोजन छत्रे न्यू इंग्लिश स्कुल च्या वतीने करण्यात आले. प्रभात फेरी मध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला राष्ट्रपुरुषांच्या तसेच पारंपारिक वेशभूषा केलेले विद्यार्थी प्रभात फेरीचे मुख्य आकर्षण होते. राष्ट्रीय छात्र सेना, अकरावी,बारावी,पाचवी,सातवी च्या जवळपास 1200 विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीत सहभागी होत देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. प्रभात फेरी छत्रे विद्यालय येथून सुरु होऊन एकात्मता चौक,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून बोहरी कंपाऊंड, चंदनवाडी, या परिसरात दाखल होत शाळेजवळ प्रशासन अधिकारी चंद्रमोरे मॅडम यांचे हस्ते समारोप करण्यात आला. प्रभात फेरीचे उद्घाटन शाळेचे सचिव दिनेश धारवाडकर, संचालक पंचवाघ सर, मुख्याध्यापक श्री. थोरात सर,उपमुख्याध्यापक श्री. देशपांडे सर पर्यवेक्षक श्री. व्यवहारे सर, पर्यवेक्षिका सौ. पोतदार मॅडम,यांचे हस्ते करण्यात आले होते. प्रभात फेरी चे यशस्वी आयोजन शाळेतील शिक्षक व शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!
शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...











