कोरोना काळापासून रेल्वे प्रशासनाने बंद केलेल्या रेल्वे गाड्या आणि त्या गाड्यांचे थांबे हळू हळू पूर्ववत करण्याचे धोरण रेल्वे प्रशासन राबवीत असतांनाच मात्र नांदगावकरांच्या मागण्यांकडे मात्र साफ दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.काहीदिवसांपूर्वी नांदगावकर नागरिकांनी आणि प्रवाशांनी नांदगावच्या रेल्वे स्थानकावर गाड्यांना थांब्याकरीता रेल्वे स्टेशन येथे आंदोलन केले होते. ” आम्ही नांदगावकर – प्रश्न माझ्या गावाचा” असे घोषवाक्य म्हणत नांदगावकरांनी दि. ७ ऑगस्ट रोजी एक बैठकही बोलवण्यात आली होती नांदगाव शहरात याच मागणीसाठी बॅनर लावत नांदगावकर जागे व्हा… आपल्या हक्काच्या गाड्या थांबवण्यासाठी संघर्ष करा अशा आशयाचे फलकातुन मागणी जोर धरू लागली आहे. रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी आतापावेतो अनेक निवेदने दिली गेली असूनही स्टेशनला पूर्वी थांबणाऱ्या गाड्यांना थांबा रेल्वे प्रशासनाकडून दिला जात नसल्याने प्रवाशीवर्गाचे अतोनात हाल होत आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार व केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी संसद भवनात नांदगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे थांब्याबद्दल केलेल्या मागणीला दिड वर्ष उलटून ही नांदगाव करांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम रेल्वे प्रशासन करीत आहे. रेल्वे प्रशासनाने खा. डॉ. भारती पवार यांच्या मागणीची दखल घेतलेली नाही. नांदगाव करांची रेल्वे थांब्याची मागणी पण खासदार, केद्रींय मंत्री राज्यमंत्री यांच्या मागणीला रेल्वे मंत्रालय कुठलीही ठोस कार्यवाही करत नसल्याने याबाबतीत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोवीड -१९ कोरोनाचे कारणे देत रेल्वेने नांदगावच्या प्रवाशाचे जाणीवपूर्वक हाल केलेले आहे. रेल्वेने ईतर स्थानकावर गाड्यांचे थांबे जैसे थे ठेवले आहे. गाडी क्रमांक – काशी एक्सप्रेस 15017/15018 ही गाडी सर्व थांबे ( लासलगावसह) घेत असून,
फक्त नांदगावचा थांबा काढण्यात आला आहे. पुढे जनता एक्सप्रेस – 13201/02 ही गाडी सर्व थांबे ( निफाडसह) नांदगावलाच थांबा काढला आहे. यामुळे प्रवाशाचे हाल होणार नाही यासाठी रेल्वेने या गाड्या पुणे – भुसावळ हुतात्मा – 11025/26 एक्स, जनता एक्स- 13201/02, झेलम एक्स.- 11077/78, महानगरी एक्स – 22177/78, कामायनी एक्स- 11071/72, काशी एक्स- 15017/18, कुर्शीनगर एक्स- 22537/38, शालीमार एक्स-18029/30 या गाड्या नांदगाव स्टेशनला सर्व थांबे पूर्ववत झालेच पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे. यामुळे असे आशयाचे फलक नांदगाव शहरात झळकल्याने नांदगावकर कोणती भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
कोरोना पूर्वी असणारे थांबे पूर्ववत करण्यात यावे अशी मागणी सर्व नांदगावकर प्रवाशांची आहे. अशी मागणी तुषार पांडे , बबलु सय्यद, हनीफ शेख , दिनेश पिंगळे , प्रशांत साळवे, कलीम तडवी, सचिन महिराल ,संतोष गुप्ता, उमेश उगले ,चंदु संगवे आदीनी केली आहे.
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!
शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...











