loader image
[ays_poll id=7]

मनमाडचे प्रसिद्ध कवी प्रदीप गुजराथी यांची सूर्योदय अक्षर लेखन पुरस्कारासाठी निवड

Aug 11, 2022


जळगाव तथा नाशिकमधील साहित्य क्षेत्रातील अग्रेसर सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्यावतीने गोदा साहित्य गौरव, सेवारत्न व अक्षर लेखन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

मनमाड चे प्रसिद्ध कवी, शतकवीर रक्तदाते प्रदीप गुजराथी यांची निवड
सूर्योदय अक्षर लेखन पुरस्कारासाठी झाली आहे.

सूर्योदय साहित्य मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी ही घोषणा केली. नोव्हेंबर महिन्यात नाशिक येथे होणाऱ्या एक दिवसीय राज्यस्तरीय 19 वे साहित्य संमेलनात गुजराथी यांना पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे असे नाशिक जिल्हाध्यक्ष सावळीराम तिदमे, शहराध्यक्ष जनार्दन माळी यांनी सांगितले.
प्रदीप गुजराथी यांचे आतापर्यंत रक्तगंध, रक्तदान घोषवाक्ये आणि बरचं काही तसेच
वा….! वात्रटिकेचा ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे मनमाड सार्वजनिक वाचनालय, जनकल्याण रक्तपेढी (नाशिक ), कलाक्षर व माध्यम सांस्कृतिक मंच व विविध संघटनांनी अभिनंदन केले आहे.
मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे अभिनंदन आणि शुभेच्छा


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.