loader image
[ays_poll id=7]

नांदगावकरांना तूर्तास दिलासा ; तीन रेल्वे गाड्यांचे थांबे मंजूर

Aug 11, 2022


नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या काळात रेल्वे प्रशासनाने अनेक प्रवाशी रेल्वे गाड्यांचे थांबे नांदगाव रेल्वे स्थानक येथे बंद केले होते .
नांदगाव करानी अनेक वेळा निवेदने दिली होती. गत सप्ताहात नांदगावकर रेल्वे प्रवाशी संघटनेने बैठक घेवून आंदोलनाचा इशारा दिला होता. तसेच केद्रींय मंत्री खासदार डॉ. भारतीताई पवार यांच्या फोटोसह शहरातील प्रमुख चौकात बॅनर व्दारे नांदगाव रेल्वे स्टेशन सदंर्भातील समस्या मांडल्या होत्या . त्याचाच परिणाम म्हणून आज केद्रींय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी १५०१७/१५०१८ गोरखपुर लोकमान्य टिळक टर्मिनस काशी एक्सप्रेस व २२१७७/२२१७८ वाराणशी मुबंई महानगरी एक्सप्रेस या दोन्ही गाडयांना १४ ऑगष्ट पासून ६ महिन्यासाठी प्रायोगिक तत्वावर थांबा मंजूर केल्याची माहीती मध्य रेल्वेच्या प्रसिध्दि पत्रकात दिली आहे.
याबाबत नांदगाव प्रवाशी संघटनेने नाराजी व्यक्त केली असून फक्त काशी व महानगरी या दोन गाडयांना थांबा दिला असून तो सुद्वा प्रायोगिक तत्वावर आहे अजूनही कामायनी,झेलम,कुषीनगर,या तीन प्रवाशी गाड्या नांदगाव स्टेशन वर थांबल्याच पाहीजेत व त्यासाठी संघर्ष करणार असल्याचे आम्ही नांदगावकर प्रवाशी संघटनेने सांगितले .


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.