loader image
[ays_poll id=7]

तरसाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी : बेजगाव येथील घटना

Aug 12, 2022


मनमाडपासून जवळ असलेल्या बेजगाव येथील अनिल रहाणे, गणेश सानप, भाऊसाहेब लहाणे हे तिघे शेतातकडे जात असतांना झुडपांमध्ये लपून बसलेल्या तरसाने त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे तिघे जण गोंधळून गेले यात अनिल लहाणे हा जखमी झाला त्याच्या हाता-पायावर मोठ्या जखमा झाल्या. त्यानंतर गणेश सानप व भाऊसाहेब लहाने यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रसंगवधान राखत जवळच्या सबस्टेशनमध्ये धाव घेत स्वत:चा बचाव केला त्यानंतर तरसाने तेथून धूम ठोकली जखमी अनिलवर मोहेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. तर माळेगाव कर्यात येथे बिबट्याने दोन जनावरे फस्त केल्याने घाट माथ्यावरील नागरीकांमध्ये दहशतीच वातावरण परले असून वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. या परिसरात लांडगे, कोल्हे, तरस या हिंस्त्र प्राणी अधून-मधून आढळून येत असल्याने वनविभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.