loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहर ब्लॉक काँग्रेस तर्फे आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन

Aug 13, 2022


आज मनमाडमध्ये आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन मनमाड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अफजल शेख यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली दि. १३ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. शहरातील काँग्रेस भवन येथून पदयात्रेची सुरवात मोठ्या दिमाखात करण्यात आली. भारत माता कि जय, वंदे मातरम, आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गांनी पदयात्रा जाऊन मालेगाव रोड येथे पदयात्रेचा समारोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळेस उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. या पदयात्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष अफजल शेख, रमेशभाऊ कहांडोळे, सुभाष नहार, भीमराव जेजुरे, ऍड. शशिकांत व्यवहारे, मा. नगरसेवक संजय निकम, नाजीम शेख, कॉ. रहमान शाह, अशोककाका व्यवहारे, प्रेमराज बेदमुथा, पारसशेठ बरडिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिपकभाऊ गोगड, मा. नगराध्यक्ष बबलू पाटील, नाना शिंदे, हबीब शेख, आनंद बोथरा,अक्षय देशमुख, कोमल निकाळे, दिपा कोरडे, फकीराशेठ शिवदे,ऍड. पाटील, अनिल देवरे, बाळासाहेब साळुंके, ऍड. वाल्मिक जगताप, अन्सार शाह, जाहिद शेख,अजीज पठाण, इलियास पठाण, सईद दादा, हिरामण कुसमाडे, संसारे, ऍड. फरीदा मिठाईवाला, मुमताज आपा, फातेमा आपा,समिना आपा,राहत फौंडेशनचे कयाम सैय्यद, सोहेल जाफरी, आबिद शेख, हुजेफा खान, रिजवान कुरेशी, फुले, शाहू, आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे अध्यक्ष बेग चाचा, कार्याध्यक्ष फिरोज शेख, मुश्ताक सर, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे भीमराज लोखंडे,रमेश आव्हाड, विष्णू चव्हाण, गायकवाड गुरुजी यासह प्रमुख पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.