loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

Aug 15, 2022



मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव निमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून स्वातंत्र्योत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. सुरुवातीला लेफ्टनंट बर्डे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ध्वजारोहण व राष्ट्रगीता नंतर एन.सी.सी कॅडेट चे संचलन करण्यात आले. आपल्या मनोगतातून प्राचार्य अरुण पाटील यांनी स्वातंत्र्य दिन व अमृत महोत्सव यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. पी. बी. परदेशी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी विविध देशभक्तीपर गीतांचा तसेच नृत्याचा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मनमाड येथील मनमाड महाविद्यालय देणगीदार प्रतिनिधी श्रीमती अलकताई पाटील (शिंदे), लायन्स झोनल चेअरमन सौ.साधनाताई पाटील, सौ.नितु अहिरराव, यांनी वृषारोपण केले याप्रसंगी सौ. रजनी सुल, सौ गायत्री जगताप, सौ तेजश्री भामरे, सौ. वैशाली कुलकर्णी, सौ रेखा पाईक, सौ. संगीताताई निकम, सौ कविताताई पाटेकर उपस्थीत होते
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. पी. जी आंबेकर, कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य ज्योती पालवे, किमान कौशल्य विभागाचे उपप्राचार्य पिके बच्छाव,वरिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक रोहित शिंदे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक विठ्ठल फंड, वरिष्ठ विभागाचे क्रीडा संचालक संतोष जाधव, कनिष्ठ विभागाचे क्रीडा संचालक महेंद्र वानखेडे, महाविद्यालयाचे कुलसचिव समाधान केदारे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी रंगरंगोटी, सजावट,साफसफाईसाठी राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. त्यासाठी एनसीसी लेफ्टनंट बर्डे व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ परदेशी यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय छात्रसेना व राष्ट्रीय सेवा योजना या विभागांनी केले.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.