मनमाड:- मनमाड शहरातील गुड शेफर्ड स्कूल मध्ये 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. आयसीएसई दहावी बोर्डाच्या परीक्षेत प्रथम आलेला विद्यार्थी कु. आदित्य नितीन डोखे याची आई मीनाक्षी डोखे व नितीन डोखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे चेअरमन मा. स्टॅन्ली करकडा व विश्वस्त डॉ. नितीन जोसेफ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन सादर केले, ब्लिस फुल ब्लू, ग्रोवर ग्रीन, रेडिएन्ट रेड, यूथफुल यलो अशा चार गटा मध्ये विद्यार्थ्यांची विभागणी केली गेली होती, संचलनाचे नेतृत्व नववी चा विद्यार्थी ओम चोरमले याने केले. राष्ट्रभक्तीपर गितांच्या आवाजाने आसमंत दुमदुमुन गेला होता. बालवाडी पासुन दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले राष्ट्रभक्तीपर भाषण सादर केले. शाळेतील विध्यार्थींनीनी सौ. नेहा गुजराती यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यम् नृत्य सादर केले. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभाई पटेल, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सावित्री बाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि भारत माता अश्या, विविध स्वातंत्र सैनिकांची वेशभूषा परिधान केली. दहावीच्या विद्यार्थ्यांनी कोविड योद्धांवर देवाशिष जगत यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य सादर केले. डॉक्टर, परिचारिका, औषध विक्रेते, पोलीस कर्मचारी, सफाई कामगार अश्या सर्व कोविड योद्धांनी कोरोनाच्या काळात दिलेले योगदान लक्षात घेऊन शाळेच्या वतीने संस्थेचे चेअरमन व विश्वस्त यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. पालक शिक्षक संघाचे चे सदस्य, पालक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, शाळेचे माजी विद्यार्थी या प्रसंगी उपस्थित होते. डॉ. क्लेमेंट नायडू यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दहाविच्या विद्यार्थिनीं कु. कशफ सय्यद व अर्पिता व्हडगर यांनी केले.
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!
शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...











