loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये भारतीय अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा.

Aug 15, 2022


मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये भारतीय अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारी वकील मा श्री.शिशिर हिरे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मनमाड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हाजी मोहम्मद सलीम अहमद गाजीयानी साहेब सेक्रेटरी हज्जन सायरा बानो सलीम अहमद,सदस्या आयशा गाजीयानी मॅडम, सदस्य अब्दुल करीम सलीम अहमद गाजीयानी, हाजी तौफिक अहमद गाजीयानी, सादिकभाई पठाण, शाळेचे माजी विद्यार्थी अजहर शेख शफी (पत्रकार प्रबंध भूमि महाराष्ट्र न्यूज) तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. शाळेच्या प्रांगणात शाळेतील शिक्षिकांनी रांगोळीची लक्षवेधी सजावट केली होती.

ध्वजारोहणा नंतर स्वातंत्र्य दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष हाजी सलीम अहमद गाजीयानी यांनी भुषविले. शाळेचे उपशिक्षिका सौ. कराड सविता सचिन यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करुन दिला. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेवाळे भुषण दशरथ समन्वयक श्री. निकम अमोल, पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर व उपशिक्षक शेख आरीफ कासम यांच्या हस्ते आलेल्या सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आले.

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थीनींनी देशभक्तीपर समूह गीत व भाषणे सादर केले. तसेच देशभक्ती गितावर लेझीम पथक व डंबेस पथक यांनी उत्कृष्ट कार्यक्रम सादर करुन आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे उपस्थित पालक वर्ग व विद्यार्थ्यांचे मन जिंकले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.श्री.Adv.शिशिर हिरे साहेब यांनी संस्थेचे संस्थापक कै. हाजी अहमद सेठ यांनी मनमाड येथे उर्दु व मराठी माध्यम एकत्रित शिक्षणाचे वटवृक्ष निर्माण केल्याबद्दल प्रशंसा केली. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना भारतीय अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे महत्व विषद करून शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन शाळेतील विद्यार्थ्यांना संस्थेकडुन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते मोफत गणवेश वाटप करण्यात आले.

कार्यक्रमानंतर मनमाड एज्युकेशन सोसायटी तर्फे आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना बिस्कीटांचे पाकीटे देण्यात आली. शाळेचे उपशिक्षक सैय्यद अफरोजोद्दीन व उपशिक्षिका सौ. कराड सविता सचिन यांनी सुत्रसंचालन केले. संस्थेच्या सदस्या आयशा गाजीयानी मॅडम, मुख्याध्यापक श्री. भुषण शेवाळे सर संस्था व शाळा समन्वयक श्री. अमोल निकम सर यांचे मार्गदर्शन लाभले.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.