मनमाड: येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या डॉक्टर श्वेता गावडे (करुणा हॉस्पिटल,मनमाड) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे माननीय मुख्याध्यापक रेव्ह. फादर माल्कम नाथो, मा. पर्यवेक्षिका सिस्टर शैला, या. फादर लॉईड, प्राथमिक शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सौ. अर्चना निकाळे मॅडम, सेंट झेवियर इंग्लिश मीडियम प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत राँल्फीसर, माजी. मुख्याध्यापक मा.फादर केनेथ डिसूजा, माजी नगरसेविका सौ.पुष्पलता मोरे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री. संजय बोरसे, फादर जोसेफ, श्री. फ्रान्सिस फर्नांडिस आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात आपले ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल केल्यास ते आपले आपल्या गावाचे समाजाचे व राष्ट्राचे नाव उज्वल करू शकतात, असे प्रतिपादन आपल्या भाषणातून डॉक्टर श्वेता गावडे यांनी केले; तर विद्यार्थ्यांनी आपल्या मनामध्ये देशाभिमान रुजवावा तीच खरी देशाची सेवा ठरेल, असे प्रतिपादन शाळेचे माननीय मुख्याध्यापक रेव्ह फादर मालकम नाथो यांनी केले. श्री.सुधाकर कातकडे सर व श्री. दत्तूजाधव सर तसेच श्री.स्वप्नील बाकळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय गटांच्या पथकाने
शिस्तबद्ध संचलन करुन उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली. श्रीमती जयश्री पारखे मॅडम, सौ अंजलीना झेवियर व श्री. अशोक गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय गायक वृंदाने देशभक्तीपर गीते सादर केलीत.कु.समृद्धी गोडळकर हिने देशाभिमान जागवणारे भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. जान्हवी घेगडमल व सौ. योगिता गोडळकर मॅडम यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्रीमती जयश्री पारखे मॅडम यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन श्री. हेमंत वाले यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार माननीय मुख्याध्यापकांच्या व पर्यवेक्षकांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमात शाळेतर्फे एस.एस.सी.मार्च 2021 च्या परीक्षेत सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तसेच विविध विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सेंट झेवियर च्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी थोर राष्ट्रपुरुषांच्या व देश भक्तांच्या वेशात येऊन त्यांची गाजलेली देशभक्तीपर वाक्य सादर केलीत.













