loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडीओ) “आम्ही नांदगावकर प्रश्न आमच्या गावाचा ” यांच्या तर्फे शहरातील गांधी चौकात धरणे आंदोलन

Aug 16, 2022


नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : नांदगाव रेल्वे स्टेशन वर प्रवाशी गाड्याना थांबा मिळावा या मागणी साठी “आम्ही नांदगावकर प्रश्न आमच्या गावाचा ” यांच्या तर्फे शहरातील गांधी चौकात धरणे आंदोलन .
कोरोना महामारी मुळे नांदगाव रेल्वे स्टेशन वरील प्रवाशी गाड्यां चे थांबे रेल्वे प्रशासनाने बंद केले होते . “आम्ही नांदगावकर प्रश्न आमच्या गावाचा ” या नावाने बॅनर तयार करून त्यावर केंद्रीय मंत्री ना.डॉ. भारती पवार यांचा फोटो लावून शहरातील मुख्य चौकात सदर बॅनर लावले असता त्याचा परिणाम म्हणून रेल्वे प्रशासनाने काशी एक्स्प्रेस व महानगरी एक्स्प्रेस या दोन गाड्यांना थांबा दिला पण नांदगाव करांची मुख्य मागणी कामायणी, झेलम, शालीमार, जनता, कुशीनगर, हुतात्मा या प्रवाशी गाडयाना थांबा मिळावा तसेच पादचारी पुल मागणी साठी नांदगाव करानी आज महात्मा गांधी चौकात धरणे आंदोलन केले . यावेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला .
नांदगाव करांची सदर मागणी मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल . प्रशासनाने मागणीची त्वरीत दखल घ्यावी असा इशारा देण्यात आला .


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.