मनमाड ता १६ : डौलाने फडकणारे तिरंगाध्वज, डिजेवर वाजली जाणारी देशभक्तीपर गीते, पांढरे शुभ्र कपडे घातलेले मनमाडकर, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मनमाड शहर स्वागत समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेतील आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक खेळाडू सैफ तांबोळीसह इतर खेळाडूंची काढण्यात आलेल्या रॅलीने शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण केले होते

इंग्लंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत जिम्नॅस्टिक खेळात नेत्रदिपक कामगिरी करीत भारताचा तिरंगा फडकविणारा मनमाडचा भूमिपुत्र सैफ सादिक तांबोळी यांचे मनमाडमध्ये आगमन होताच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मनमाडकरांच्यावतीने त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले .सैफसह आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंगपटू आकांक्षा व्यवहारे व कुस्तीपटू शुभम आचपळे, वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे, तृप्ती पराशर यांचा उघड्या वाहनातून महात्मा फुले पुतळ्यापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. डिजेवर वाजवले जाणारे देशभक्तीपर मंजुळ गीतांनी वातावरण निर्मिती केली होती. सर्वांच्या हातात तिरंगा ध्वज होते तर प्रत्येकांनी पांढरे शुभ्र कपडे परिधान केले होते पुरुषांसह महिला देखील सहभागी झाल्या होत्या शहरातील सर्व प्रकारातील क्रीडा खेळाडू सहभागी झाले होते तर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले रॅली एकात्मता चौकात आल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ प्रवीण शिंगी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल, डॉ सुनील बागरेचा, मनमाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, रिपाई जिल्हासंपर्क प्रमुख राजेंद्र आहिरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष दीपक गोगड, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, मनसे अध्यक्ष सचिन शिरूड, भाजप अध्यक्ष जय फुलवानी, रिपाई अध्यक्ष दिलीप नरवडे, वंचित अध्यक्ष आम्रपाली निकम, काँग्रेसचे सुनील गवंदे, वैद्यकीय अधिक्षक डॉ मोहन वारके, शिंदे गट शिवसेनेचे साईनाथ गिडगे, जेष्ठ इंजिनिअर संतोष बोडखे, गंगादादा त्रिभुवन, व्यापारी अध्यक्ष राजेंद्र पारीक, समाजसेवक संजय कटारे, विलास कटारे, अनिल निरभवणे आदी उपस्थित होते मनमाडकरांच्यावतीने विविध ठिकाणी रॅलीचे स्वागत करण्यात आले मनमाडच्या या सर्व भूमीपुत्रांचा मनमाड शहर स्वागत समितीचे अध्यक्ष अमोल खरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला यावेळी देधभक्तीपर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पालिकेच्यावतीने खेळाडूंना मानपत्र देण्यात आले. सूत्रसंचालन हेमंत कातकडे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन समितीचे फिरोज शेख, कय्याम सय्यद, कादिर शेख, शकुर शेख, राहील मन्सूरी यांनी केले यावेळी माजी आमदार राजेंद्र देशमुख, नामको संचालक सुभाष नहार, पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, स्वाती मगर, रेणुका जयस्वाल, मुक्ता नलावडे, किरण शिंदे, सुनील पाटील, सादिक तांबोळी, राजेंद्र आहेर, गोटू केकान, रवींद्र सांगळे, निलेश वाघ, अशोक बिदरी, निलेश व्यवहारे, बब्बू कुरेशी, लियाकत शेख, नाजीम शेख, प्रदीप कांबळे, योगेश देशपांडे यांच्यासह शहरातील विविध पक्ष, संघटना, शैक्षणिक, सामाजिक संस्था, आजी माजी लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते












