loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरामध्ये भारतीय स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव सोहळा उत्साहात साजरा….

Aug 16, 2022


मनमाड (योगेश म्हस्के) : स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे.ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्यदिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.

15 ऑगस्ट हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते.

यंदाच्या वर्षी भारत देश आपला 75 वा म्हणजेच अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे.मनमाड शहरातील पोलीस स्टेशन , मनमाड न्यायालय , मनमाड नगर परिषद , डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रीडांगण , महर्षी वाल्मिकी क्रीडांगण , सी.आर.एम.एस.कार्यालय , ऑल इंडिया एस.सी.एस. टी रेल्वे एम्प्लॉ.कार्यालय , विशेष निगराणी शाळा , सर्व सरकारी कार्यालये , शहरातील सर्व शाळा , महाविद्यालय , येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून 75 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यंदाच्या वर्षी भारत सरकारच्या वतीने देशाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने आयोजित हर-घर तिरंगा अभियानास देखील शहरातील नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावुन चांगला प्रतिसाद दिला.शहरातील अनेक सामाजिक आणि राजकीय संस्था , संघटना यांच्याद्वारे भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.