वागदर्डी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळू महाराज झाल्टे होते. प्रमुख पाहुणे म्हणून इयत्ता अकरावीचा विद्यार्थी व एशियन कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक विजेता शुभम हरी अचपळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी आजी-माजी सैनिकांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू शुभम अचपळे, सैफ तांबोळी, आकांक्षा व्यवहारे तसेच आंतरराष्ट्रीय कोच तृप्ती पाराशरे व प्रवीण व्यवहारे सर यांचाही सत्कार करण्यात आला. इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच लेझीम च्या तालावर अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री प्रकाश काका जैन, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अशोक कहांडळ, प्राचार्य श्री.भराडे एस के , सरपंच ग्रामपंचायत सदस्य ,पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











