loader image
[ays_poll id=7]

डॉ. वानखेडे वि.अ. यांना (ISTE) चा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार.

Aug 17, 2022

चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्याश्रम संचलित श्री एच एच जे बी पॉलीटेक्नीकचे प्राचार्य डॉ. विशाल अशोक वानखेडे यांना इंडीयन सोसायटी फॉर टेक्नीकल एज्युकेशन (ISTE) या राष्ट्रस्तरावरील संस्थेद्वोरे उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सदरची निवड ही महाराष्ट्रातील व गोवा या राज्यातील विविध पॉलीटेक्नीक यांच्यातून करण्यात आली. आय एस टी ई ही राष्ट्रीय स्तरावरील तंत्रशिक्षण क्षेत्रात कार्यकरणा-या विविध संस्थेतील शिक्षक, विद्यार्थी यांना सभासद होण्याची संधी देते. या संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण प्रशिक्षण, नवनविन तंत्रज्ञानावरील कार्यशाळा विविध उपक्रम, विद्यार्थ्यासाठी स्टुडंट चॅप्टर, शिक्षकांसाठी स्टाफ चॅप्टर, वार्षिक व कायम स्वरूपात सभासदत्व देते. आय एस टी ई दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागविते त्यात उत्कृष्ट पॉलीटेक्नीक शिक्षक, उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट वुमन टिचर, उत्कृष्ट विद्यार्थी, उत्कृष्ट प्रोजेक्ट, अशा विविध गटांसाठी आवेदन मागविले जातात. या पुरस्कारांची विविध निकषांच्या आधारे जसे व्यक्तिगत कार्य, पुरस्कार, नाविन्यपुर्ण उपक्रमांचे आयोजन, नविन शैक्षणिक धोरण, त्याचे विद्यार्थ्यासाठी उपयोजना गुणवंतावाढीचे उपक्रम, शिक्षकांसाठी विकास कार्यक्रमाचे आयोजन, उद्योग क्षेत्रात योगदान, रोजगार, प्रशिक्षणासाठी केलेले प्रयत्न, सामाजिक उपक्रम या आधारावर संपुर्ण महाराष्ट्र व गोवा राज्यातील पॉलीटेक्नीक मधुन त्यांची निवड करण्यात आली. डॉ. वानखेडे वि.अ. यांनी मिळविलेल्या या नामांकीत पुरस्काराबद्दल त्यांचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा.श्री बेबीलालजी संचेती व विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष मा.श्री दिनेशजी लोढा,मानद सचिव मा.श्री जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष मा.श्री अजीतकुमारजी सुराणा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष आणि तंत्रनिकेतनाचे समन्वयक मा.श्री अरविंदकुमारजी भन्साळी,सह मानद सचिव मा.श्री.झुंबरलालजी भंडारी,व तंत्रनिकेतनाचे मुख्य समन्वयक तथा प्रबंध समिती सदस्य मा.श्री राजेंद्रकुमारजी बंब यांनी अभिनंदन केले .

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
.