loader image
[ays_poll id=7]

कवी रविंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूल येथे ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Aug 17, 2022


कवी रविंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूल येथे ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता १० वी मध्ये शाळेत प्रथम येणा – या विदयार्थ्यांच्या पालकांच्या हस्ते दरवर्षी १५ ऑगस्टला ध्वजारोहण करण्यात येते . मार्च २०२२ मध्ये वेदांत नरेंद्र जोशी हा ९ ७.६० % मार्क घेवून शाळेत व मनमाड केंद्रात पहिला आल्याने कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्याचे पालक श्री . नरेंद्र जोशी , सौ . गौरी जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . ध्वजारोहणानंतर झालेल्या परेडमधून चारही हाउसच्या कॅप्टन , व्हाईस कॅप्टन व त्यांच्या पथकाने राष्ट्रध्वजास सलामी दिली . वेदांतचे आजी – आजोबा श्री . प्रभाकर जोशी व सौ . सिंधू जोशी देखील उपस्थित होते . स्वातंत्र्याच्या अमृतमहोस्तवाचे औचित्य साधून मनमाडचे नांव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणा – या एकमेव महिला प्रशिक्षक कु . तृप्ती पाराशर , आंतरराष्ट्रीय खेळाडू कु . आकांक्षा व्यवहारे आणि प्रशिक्षक श्री . प्रविण व्यवहारे यांचाही संस्था व शाळेच्यावतीने सन्मानचिन्ह , शाल व भेटवस्तू देवून समारंभपूर्वक सन्मान करण्यात आला .

कु . आकांक्षा व्यवहारे हिचे पालक श्री . किशोर व्यवहारे यांचादेखील सत्कार करण्यात आला . सत्काराला उत्तर देतांना श्री . प्रविण व्यवहारे यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले की , केआरटी संस्था व शाळा मनमाड शहरातील अतिशय नावाजलेली व दर्जेदार शिक्षण देणारी संस्था आहे व त्यांच्याकडून नेहमीच सामाजिक भान ठेवून मनमाड शहरात विविध क्षेत्रात दिमाखदार कामगिरी करणा – या व्यक्तींचे नेहमीच कौतुक व सत्कार करीत असतात . तसेच या शाळेतील अनेक विदयार्थी जय भवानी व्यायामशाळेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य करण्यास सज्ज आहे . असे नमूद केले . प्रमुख पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक प्राचार्य मुकेश मिसर यांनी केला . कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री . नरेंद्र जोशी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की , आपल्या मुलाच्या यशामुळे व शाळेच्या परंपरेमुळे आपल्यासारख्या सामान्य मध्यमवर्गीय कुटूंबास ध्वजारोहणाचा सपत्निक मिळालेला मान हा अतिशय गौरवास्पद वाटतो . आपल्या मुलाच्या यशामध्ये शाळेतील सर्व शिक्षकांचे आणि संस्था पदाधिका – यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याबद्दल त्यांनी सर्व कुटूंबाच्यावतीने अंतःकरणापासून आभार मानले . वेदांतचे आजोबा श्री . प्रभाकर जोशी यांनी शाळेस रु .५००१ / – ची देणगी देखील दिली . आला . शाळेच्या परंपरेप्रमाणे पहिल्या तीन विदयार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात ठेतील विषयशिक्षकांकडून आपापल्या विषयात प्रथम येणा – या विदयार्थ्यास स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले . संस्थेच्यावतीने दरवर्षी देण्यात येणा – या मिलिंद गुणवत्ता शिष्यवृत्ती अंतर्गत या वर्षी वेदांत नरेंद्र जोशी याची निवड करण्यात आली . व मागील लाभार्थी कु . धनश्री बाळू घुगे आणि कु . मृणाल प्रदिप संसारे या दोन विदयार्थिनींसह एकूण तिघांना संस्थेच्यावतीने शिष्यवृत्तीचे धनादेश प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले . विदयार्थ्यांमध्ये गुणवत्तावाढीस प्रेरणा मिळावी म्हणून शाळेचे हितचिंतक श्री . शरद जगताप यांचेकडून प्रथम पाच विदयार्थ्यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कमेचे पारितोषिक व श्री . सुधाकर गरूड यांचेकडून प्रथम तीन विदयार्थ्यांना सन्मानचिन्ह व रोख रकमेचे पारितोषिक तर सौ . शोभाबाई लहानू संसारे यांचेकडून प्रथम तीन विदयार्थ्यांना रोख रकमेचे पारितोषिक उपस्थित पाहूणे व संस्था पदाधिका – यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले .

संस्थेच्यावतीने दरवर्षी देण्यात येणा – या मिलिंद गुणवत्ता शिष्यवृत्ती अंतर्गत या वर्षी वेदांत नरेंद्र जोशी • याची निवड करण्यात आली . व मागील लाभार्थी कु . धनश्री बालू पुगे आणि कु . मृणाल प्रदिप संसारे या दोन विदयार्थिनींसह एकूण तिघांना संस्थेच्यावतीने शिष्यवृत्तीचे धनादेश प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले . विदयार्थ्यामध्ये गुणवत्तावाढीस प्रेरणा मिळावी म्हणून शाळेचे हितचिंतक श्री . शरद जगताप यांचेकडून प्रथम पाच विदयार्थ्यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कमेचे पारितोषिक व श्री . सुधाकर गरूड यांचेकडून प्रथम तीन विदयार्थ्यांना सन्मानचिन्ह व रोख रकमेचे पारितोषिक तर सौ . शोभाबाई लहानू संसारे यांचेकडून प्रथम तीन विदयार्थ्यांना रोख रकमेचे पारितोषिक उपस्थित पाहूणे व संस्था पदाधिका – यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले . विदयार्थी गुणगौरव व आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रशिक्षक व खेळाडूंचा परिचय व सुत्रसंचलन सौ . संगिता कदम यांनी केले . कार्यक्रमात संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री . वैभव कुलकर्णी , श्री . दिपक व्यवहारे , धनंजय निंभोरकर , किशोर माळी , मनोज छाबडा , तुषार चौधरी , डॉ . प्रदिप साळी , श्री . गणेश लहाने यांच्यासह सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले . कार्यक्रमाचे अतिशय सुंदर , आगळेवेगळे तसेच प्रेक्षकांसोबत • दिलखुलास गप्पा मारत सुत्रसंचलन कु . ब्राम्ही सयाजी गायकवाड व कु . अस्मिता लक्ष्मण झाल्टे या विदयार्थीनीनी केले . आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत इयत्ता ९ वी च्या मुलींनी देशभक्तीपर गीतावर सुंदर समृहनृत्य सादर केले . तसेच जयोस्तुते हे गीत विदयार्थ्यांनी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले . इयत्ता ५ वी ते १० वीच्या मुलींनी सादर केलेले तालबध्द व सुरेख लेझीम नृत्य सादर केले . कु . वैष्णवी पाटील व कु . अनुष्का देवगिर यांनी १५ ऑगस्ट निमित्त भाषण केले . सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन श्री . सचिन बिडवे , श्री . विशाल झाल्टे , सौ . अंजली लहाने , सी . प्रतिभा पवार यांनी केले . कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी श्री . राम महाले , श्री . राजेश सोनवणे , सौ . स्वाती जाधव , कु . भारती पवार यांनी इतर सर्व कर्मचा – यांच्या मदतीने पार पाडली . पावसाच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला माजी विदयार्थी व पालकांची कुटूंबियांसोवत उपस्थिती लक्षणीय होती . ची सांगता विदयार्थ्यांना खाऊवाटप करून वंदे मातरमने करण्यात आली .


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.