नांदगांव (सोमनाथ घोंगाणे) : नांदगाव शहरातील शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुमित गुप्ता यांचा उत्कृष्ट सामाजीक कार्याबद्दल समाजसेवक म्हणून स्वांतत्राच्या अमृत महोत्सावानिमित्त १५ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसिलदार डॉ. सिद्बार्थ मोरे यांच्या हस्ते शाल व प्रशस्ती पत्रक देवून सत्कार करण्यात आला.
शिवसंस्कार संस्थेचे अध्यक्ष सुमीत गुप्ता यांनी शहरात कपड़े वाटप, शालेय साहित्य वाटप, घर संसार साहित्य वाटप, झाड़े-लावा झाड़े जगवा तसेच झाडे मोफत वाटप, गरजू पेशंट ला दवाखान्याची वेळोवेळी मदत करने या सर्व गोष्टी नांदगांवकरांच्या सहाय्याने व मित्र परिवाराला सोबत घेवून करीत आहे. तसेच महात्मा गांधी चौकात १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दिवशी ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेवून झेडांवदन कार्यक्रम आयोजित करीत असतात तसेच यंदा १५ ऑगस्टला ला घरोघर झेडयांचे मोफत वाटप केले अशा या समाजसेवकाचा तहसीलदार डॉ.सिद्धार्थ मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











