loader image
[ays_poll id=7]

जनहित विकास संस्था आणि मनमाड बचाव कृती समितीतर्फे ”हम सब एक है” अभिनव उपक्रम

Aug 18, 2022


मनमाड – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्ताने जनहित विकास संस्था आणि मनमाड बचाव कृती समितीतर्फे ”हम सब एक है” हा अभिनव उपक्रम घेण्यात आला. ७ विविध धर्मीय ‘पती-पत्नी’ यांना तिरंगा ध्वज फडकविण्याचा सन्मान देऊन ‘हिंदू,मुस्लिम,शीख,बौद्ध, इसाई हम सब एक है भाई भाई’ ,’हम सब एक है’, ‘भारतमाता कि जय’,’संविधानाचे रक्षण करूया’ अशा जोशीला घोषणा देण्यात आल्या. ७५ व्य स्वातंत्र्य दिनाची यादगार म्हणून प्रत्येक जोडप्याला एका वृक्षाचे रोप सस्नेह भेट देऊन पर्यावरण संगोपनाचा संदेशही देण्यात आला.
शहरातील एकात्मता चौकात राष्ट्रभक्तीपर गीतांनी भारावून गेलेल्या वातावरणात ११०० लोकांना राष्ट्रध्वजाचे बिल्ले लावण्यात आले. श्री. व सौ. सद्दाम अत्तार,श्री. व सौ. आनंद बोथरा, श्री. व सौ. चंद्रकांत जाधव,श्री. व सौ. अशोक बिद्री,श्री. व सौ. जॉर्ज स्वामी,श्री. व सौ. गुरुजीतसिंह कांत, श्री. व सौ.किसनराव मढे (सेवानिवृत्त जवान ) ह्या विविध धर्मीय जोडप्यांनी सहभाग दिला.
दरम्यान याच निमित्ताने उपक्रमाचे अलौकिकत्व असलेले भारतीय लष्करातील सेवानिवृत्त जवान दादाजीसिंह गिरिधरसिंह परदेशी (ठाकूर) यांचा गौरव करण्यात आला. १९६२ मध्ये चीन युद्ध, १९६५ मध्ये पाकिस्तान युद्ध आणि १९७१ बांगला देश मुक्ती संग्राम ह्या तिन्हीही युद्धात दादाजीसिंह ठाकूर (वय ९२ वर्षे) यांनी भाग घेतलेला होता. त्यांच्या निवासी जाऊन त्यांचा त्यांच्या पत्नीसह गौरव करण्यात आला. एका योद्ध्याचा परिचय अवघ्या मनमाडकरांना यानिमित्त करून देण्यात आला. जनहित विकास संस्थेचे मनोज गांगुर्डे आणि अणि मनमाड बचाव समितीचे पुंडलिक कचरे,युनूस पठाण यांनी सूत्रसंचालन केले. आयोजनात सुषमा तिवारी, शमशाद सय्यद, रश्मी मोरे, मोतीराम भालेराव,आर. बी. ढेंगळे यांनी मार्गदर्शन केले. चंद्रकांत जाधव, रमेश खरे, सुशांत केदारे, बबिता चिंडालिया , बिस्मिल्लाबी मन्सुरी, रेखा येणारे, अर्जुन साळवे, सीमा वानखेडे, राणी जगताप, रतन निकम, कांतीलाल येणारे, पोपटशेठ बेदमुथा,सिद्धार्थ संसारे,सलीमभाई सोनावाला, अशोक परदेशी आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.