loader image
[ays_poll id=7]

नांदगाव नगरपरिषदेने स्वच्छता मोहीम राबवावी : नागरिकांचे मुख्याधिकारी यांना निवेदन

Aug 18, 2022


नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) :नांदगाव शहरात अस्वच्छता मोठया प्रमाणावर वाढली असून शहरात डेंगू व मलेरिया सद्श्य आजाराचे रूग्ण वाढले असल्याने नगरपरिषदेने त्वरीत डास निर्मूलन मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी मुख्याधिकारी डॉ. विवेक धांडे यांना निवेदन देऊन केली आहे.
शहरात स्वच्छता होत नसल्याने घाणीचे साग्राज्य मोठया प्रमाणावर झाले असून शहरात डेंग्यू व मलेरिया चे रूग्ण खुप वाढले आहे. तसेच शहरात मोकाट जनावरे खुपच वाढली असून एका मोकाट वळूने लीलाबाई जगताप (वय ७२) या वृद्वेवर हल्ला केल्याने सदर महिलेचे पायाचे हाड मोडले आहे.
शहरातील भोलेनगर,चांडक प्लाट, अब्दुल करीमशेट चाळ, या भागातील विद्यार्थी, रहिवाशी ‘यांना शहरात येण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासुन रस्ताच नसल्याने रेल्वे रुळावरून ये जा करावी लागत आहे.
या समस्ये संदर्भात शहरातील डॉ. गणेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखााली नागरिकांनी मुख्याधिकारी डॉ. विवेक धांडे यांना निवेदन दिले.
सदर निवेदनावर डॉ. गणेश चव्हाण,अशोक पाटील,कृष्णा खांडेकर,सुपडू जगताप,संतोष निकम, विकास चव्हाण, डिंगबर महाले,विनोद महाले,दिपक महाले,कैलास थोरात,रवींद्र सोनवणे,सुभाष आयनोर, गणेश बोगीर,शुभम भावसार,आशुतोष कमुणकर,देवानंद धामणे,पिंटू दिक्षीत यांच्या सह्या आहे.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.