केंद्रीय विद्यालयात भारताचा 76 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य श्री सुनील परदेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला. देशभक्तीपर गीते, पारंपरिक नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. ‘आजादी का अमृत महोत्सव’ या विषयावर विद्यालयातील विद्यार्थिनी रिद्धी हिने आपले विचार मांडले. केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य श्री सुनील परदेशी यांनी यावेळी आपले विचार मांडले. त्यांनी सर्व उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.”प्रत्येकाला स्वातंत्र्य हवे असते, परंतु स्वातंत्र्याबरोबर काही कर्तव्य प्रत्येक नागरिकाला पार पाडायचे असतात. पण आपण त्या आपल्या कर्तव्यांकडे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करतो. प्रत्येक नागरिकांनी आपल्या स्वातंत्र्याचा हक्क बजावत असताना आपली कर्तव्य ही समर्थपणे पार पाडावीत ” असे विचार त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक मनोज मलासी , दहावीच्या विद्यार्थ्यांनी पूर्वा व तनिष्का यांनी केले. शिक्षक विनोद माळी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. वंदे मातरम च्या गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी जवळपास 200 नागरिक व पालक उपस्थित होते. स्वातंत्र्य महोत्सवाचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक महेंद्र वावरे ,वैभव अहिरे, सागर होले, जयशवंत खैरनार, सोनाली गुंडगळ, आम्रपाली पवार, सविता वाघ, मनीषा शिंदे,अमोल सर, निशिकांत बोर्डे, सुनील ढमाले, हरीश चावरिया इत्यादी शिक्षकांनी परिश्रम घेतले. शिक्षकेतर कर्मचारी राजू बहोत, उल्हास महाले, अर्जुन वाघ शिवाजी लहाने , श्रीकांत कातकडे , विंचू यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











