बिलकीस बानो बलात्कार प्रकरण तसेच राजस्थानमध्ये दलित विद्यार्थ्यांला झालेल्या मारहाण प्रकरणात त्याचा झालेला मृत्यू यामुळे मनमाड शहरातील दलित संघटना, मुस्लिम संघटना आक्रमक झाल्या असून नारी शक्तीचा सन्मानाची भाषा करणारे मात्र दुसरी कडे बिलकीस बानोला न्याय देऊ शकत नाही तिच्यावर अत्याचार करणाऱ्यांना निर्दोष सोडते.

आज ही दलितांवर अत्याचार सुरूच आहे. या सर्व घटनांचा निषेध व जेलभरो आंदोलन करण्यासाठी मनमाड मध्ये मोर्चा काढण्यात आला होता यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.












