loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडिओ) महाराष्ट्र सदन घोटाळा : विधानसभेत आमदार कांदे आक्रमक

Aug 25, 2022

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कालच्या पाचव्या दिवशी नांदगाव चे आमदार सुहास कांदे यांनी महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाची चौकशी प्रकरणी प्रश्न उपस्थित केले. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली, पण तरीही कांदे आक्रमक होते. यावेळी बोलताना सुहास कांदे यांनी थेट, ‘तुम्ही आमच्या उद्धव साहेबांना ब्लॅकमेल केले’ असे विधान केले. कांदेंचे या विधानाने ते सध्या चर्चेत आले आहे.
छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांचा वाद राज्यात सर्वश्रुत आहे. राज्यात महाविकास महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून त्यांचा वाद सुरू आहे. त्यावेळी हा वाद थेट तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचला होता. त्यात ठाकरेंनी हस्तक्षेप करून तो वाद काही अंशी मिटवला होता. मात्र, आज विधीमंडळाच्या सभागृहात पुन्हा हा वाद उफाळून आला. सभागृहात आज महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी कांदे आक्रमक झाले, त्यांच्या प्रश्नांची उत्तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. मात्र, तरीही त्यांचा राग काही कमी झाला नव्हता, त्यानंतर त्यांनी तुम्ही आमच्या उद्धव साहेबांना ब्लॅकमेल केले, असे विधान केले आहे.
महाराष्ट्र सदन प्रकरणात मविआने छगन भुजबळ यांना क्लिन चीट देण्यात आली असून, आज पुन्हा कांदे यांनी हा प्रश्न उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरानंतर समाधान न झाल्याने ‘अहो फडणवीस साहेब, असं काय करताय..? तुमच्याकडे बघून तर आम्ही इकडे आलोय…’, असेही आमदार कांदे म्हणाले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
.