loader image
[ays_poll id=7]

पत्रकारांनी समाजाच्या समस्यांशी एकरूप व्हावे : भास्कर कदम

Aug 25, 2022


नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाची बैठक नस्तनपुर येथे ज्येष्ठ पत्रकार भास्करभाऊ कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .
यावेळी नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाकडून श्री शनैश्वर महाराजांची आरती करण्यात आली. बैठकीच्या व्यासपीठावर मारुती जगधने,जगन पाटील,सुरेश शेळके,अमोल खरे,प्रा.सुरेश नारायने,सोमनाथ घोंगाणे,नरहरी उंबरे हे होते. यावेळेला उपस्थित पत्रकार बांधवांना मार्गदर्शन करतांना ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम म्हणाले की काम करतांना त्याचा आधार घेऊन इतरांना आधार द्या. मराठी पत्रकार संघ ही एक नांदी आहे.मराठी पत्रकारीतेला मोठी नामावली आहे. जे चांगले आहे ते घ्या, वाईटावर चर्चा नको वाईट ते गळून पडेल .समाजाच्या समस्या घेऊन चालणारा पत्रकार असतो .ज्या समाजात आपण वावरतो त्याचे आपण देणे लागतो . त्या समाजाच्या समस्यांशी एकरूप व्हा तरच समाज तुमच्या पाठीशी उभा राहील.मानसन्मान मागून मिळत नाही समाजाला तुमची उपयुक्तता कळेल तेव्हा समाज तुम्हाला सन्मान देईल. संघटन ही शक्ती वाढवायची आहे .असे मत ज्येष्ठ पत्रकर भास्कर कदम यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की एखाद्या संस्थेला नांदगांव तालुक्याने दिशा देणे हि आपल्या भाग्याची गोष्ट आहे .


यावेळी तालुका समनवयक अमोल खरे म्हणाले नांदगाव पत्रकार संघाला मान्यता मिळाली ते एक आदर्श ठरले संघटन मजबुत आहे यु ट्यूब पोर्टल ही हया संघटनेशी निगडीत आहे . संघटनेचा मेळावा लवकरच एस एम देशमुखांच्या उपस्थितीत होईल .यावेळी ज्येष्ठ पत्रकार मारुती जगधने म्हणाले की पत्रकारांनी कुटुंबाचा मेडीकल विमा करून घ्यावा ही काळाची गरज आहे.पत्रकार हा सतत ताण तणावात असतो त्यासाठी मेडीकल विमा आवश्यक आहे . न्यायडोंगरी येथील जगन पाटील म्हणाले की एकसंघ विमा सर्वांसाठी फायदेशीर आहे.संघटनेच्या माध्यमातून . आपण प्रयत्न करूया .
शकंबरीच्या तिरावर या साप्ताहिकाचे संपादक सुरेश शेळके म्हणाले की संघाची कार्यकारणी निवडावी अशी मागणी त्यांनी केली. नरहरी उंबरे म्हणाले की इतरांकडे लक्ष देऊ नका एकसंघ रहा. निलेश्वर पाटील तसेच दिपाली केदारे. ,यांनी शुभेच्छा दिल्या . संजय मोरे विरोधकांचे लक्ष आहे. ते आपल्यात फुट पाडतील . त्यांच्या कोणीही बळी पडू नहे. प्रा सुरेश नारायने यांनी संघटना वाढीला व पाठबळाला उपक्रमांची गरज आहे असे सांगितले. निलेश वाघ यांनी संघटना बांधणी गरजेची आहे असे पटवून दिले. गणेश केदारे यांनी शुभेच्छा दिल्या . बाबासाहेब बोरसे यांनी सांगितले की २० वर्षापूर्वी एकत्रीत असलेले पत्रकार आज पुन्हा एकवटले आहे. आधाराची धार तेज ठेवा योगेश म्हस्के यांनी सांगितले की संघटनेच्या माध्यमातून आरोग्य शिबीर भरवावीत .
प्रणीत आहेर म्हणाले की आपल्या माध्यमातून इतरांना प्रसिध्दी मिळते पत्रकारांनी राबविलेले कार्यक्रम ही इतराना समजले पाहिजे.
अशॊक बिदरी म्हणाले की पत्रकार संघाची मरगळ झटकली गेली आहे.
सतीश पूनतांबेकर म्हणाले की फोटोग्राफर सेंटर नजरेत ठेऊन सर्व फोटोग्राफरांना तालुका पातळीवर एक केले. सुत्रसंचालन : प्रा सुरेश नारायणे यांनी केले
यावेळी अमोल खरे , भास्कर कदम,सुरेश शेळके,मारुती जगधने,नरहरी उंबरे,सोमनाथ घोंगाणे,संजय मोरे, जगन पाटील निलेश वाघ,संदिप जेजुरकर,अशोक बिदरी,
श्री अनिल आव्हाड,प्रमित आहेर,सुरेश नारायणे, उपाली परदेशी,नाना अहिरे,बाबासाहेब बोरसे,सॅमसन आव्हाड,योगेश म्हस्के,आफरोज अत्तार, पंकज जाधव,निलेश व्यवहारे,गणेश केदारे,सचिन गायकवाड, बाबासाहेब काळे, प्रज्ञानंद जाधव,धनंजय देशमुख,रोहित शेळके,
सुहास पुणतांबेकर,
निखिल मोरे,शैलेश शेळके,प्रदिप निकम,रामदास सोनवणे,निलेश्वर पाटिल,मंगेश सोनस,विजय भावसार,बापू मार्कंड,ज्ञानेश्वर दुकळे,मिलिंद वाघ, विशाल मोरे,’राजू लहिरे आदीना यावेळी
ओळखपत्र वाटप करण्यात आले.
सोमनाथ घोंगाणे,जगननाना पाटील, संदीप जेजूरकर, संजय मोरे,
यांच्यासह नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाने विशेष परिश्रम घेतले


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.