loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहरातील रेल्वे गेट बंद करून तयार केलेला सब-वे ‘कबाब मे हड्डी’

Aug 26, 2022


नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : नांदगाव शहरातील रेल्वेगेट बंद करून तयार केलेला सब वे नागरिकासाठी आणि वाहतुकदारांसाठी ‘कबाब मे हड्डी’ बनला आहे. केवळ गेट बंद करावयाचे म्हणून घिसाडघाईने तयार केलेला आराखडा सुरवातीपासून वादात सापडला. सब वे च्या वाहतूक क्षमतेविषयी वेळोवेळी नांदगावकरांनी आवाज उठवला. भविष्यातली वाहतूक व तिची वाढ लक्षात न घेता रेल्वे प्रशासनाने तो शहरवासीयांवर थोपवला. पावसाळा असो की इतर ऋतू कायमच तो वाहतुकीच्या घशातला शुक्राचार्य ठरला आहे.दि २५ रोजी दिवसातून पाचवेळा सबवेची वाहतुन ठप्प झाली अशा वेळेला मोठी समस्या निर्माण झाली होती .येथे वाहतूक पोलिसाची त्वरीत नेमणूक करावी अशी मागणी नागरिक करीत आहे.
रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाचे हे मोठे अपयश म्हणावे की आले त्यांच्या मना….तिथे कोणाचे काही चालेना असे झाले आहे. सब वे हि ऑल सिझन कायमस्वरूपी डोकेदुखी झाली आहे. सब वे झाला त्याच वर्षी सब वे पुराच्या पाण्यात बुडाला. सब वे तून घुसलेले पाणी रस्त्यावर आले आणि रस्त्यालगतच्या इमारतीतले पहिले मजले घरे, दुकाने पाण्यात बुडाले. कोटींचे नुकसान झाले. तसेच १ महिना सदर सब वे वाहतुकीला बंद होता .त्यानंतर सब वेच्या आराखड्यावर आक्षेप घेण्यात आले. तेव्हा रेल्वे अभियंते यांनी मटन मार्केट तोडले तर मार्ग काढू असे सांगितले. लोकांच्या विरोधात नगरपरिषदेने स्वत: बांधलेल्या मार्केटवर हातोडा चालवून ते तोडले.
गुरुवार दि. २५ ऑगष्ट रोजी पाऊस नव्हता तरी कोंडी झाली. अशी कोंडी तर दररोज अनेकदा होते. सब वे वाहनांच्या कर्णकर्कश आवाजाने निनादत असतो. कोंडी झालेली वाहने क्यांव क्यांव करत आपला मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतानाचे दृश्य खूप त्रास देणारे असते. हे बघायला रेल्वेचे अधिकारी व लोकप्रतिनिधी कोणीच नसतात. पण मुकी बिचारी जनता कुणी हि हाका या न्यायाखाली दडपली गेल्याने आपली वाट शोधतांना धडपडत असते . दररोज सरासरी एखादा तरी नागरिक धडपडतो आणी अत्यंत कडवट प्रतिक्रिया देत पुढे सरकतो. एकीकडे केंद्र सरकार भविष्यातली आवाहने डोळ्यासमोर ठेवून प्रकल्पांची आखणी करत असतांना रेल्वेच्या ‘गेट बंद प्रकल्पा’ ने मात्र शहरातून जाणाऱ्या वाहतुकीचे भविष्य अंधारमय केले आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
.