Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव शहरातील रेल्वे गेट बंद करून तयार केलेला सब-वे ‘कबाब मे हड्डी’

Aug 26, 2022

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : नांदगाव शहरातील रेल्वेगेट बंद करून तयार केलेला सब वे नागरिकासाठी आणि वाहतुकदारांसाठी ‘कबाब मे हड्डी’ बनला आहे. केवळ गेट बंद करावयाचे म्हणून घिसाडघाईने तयार केलेला आराखडा सुरवातीपासून वादात सापडला. सब वे च्या वाहतूक क्षमतेविषयी वेळोवेळी नांदगावकरांनी आवाज उठवला. भविष्यातली वाहतूक व तिची वाढ लक्षात न घेता रेल्वे प्रशासनाने तो शहरवासीयांवर थोपवला. पावसाळा असो की इतर ऋतू कायमच तो वाहतुकीच्या घशातला शुक्राचार्य ठरला आहे.दि २५ रोजी दिवसातून पाचवेळा सबवेची वाहतुन ठप्प झाली अशा वेळेला मोठी समस्या निर्माण झाली होती .येथे वाहतूक पोलिसाची त्वरीत नेमणूक करावी अशी मागणी नागरिक करीत आहे.
रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाचे हे मोठे अपयश म्हणावे की आले त्यांच्या मना….तिथे कोणाचे काही चालेना असे झाले आहे. सब वे हि ऑल सिझन कायमस्वरूपी डोकेदुखी झाली आहे. सब वे झाला त्याच वर्षी सब वे पुराच्या पाण्यात बुडाला. सब वे तून घुसलेले पाणी रस्त्यावर आले आणि रस्त्यालगतच्या इमारतीतले पहिले मजले घरे, दुकाने पाण्यात बुडाले. कोटींचे नुकसान झाले. तसेच १ महिना सदर सब वे वाहतुकीला बंद होता .त्यानंतर सब वेच्या आराखड्यावर आक्षेप घेण्यात आले. तेव्हा रेल्वे अभियंते यांनी मटन मार्केट तोडले तर मार्ग काढू असे सांगितले. लोकांच्या विरोधात नगरपरिषदेने स्वत: बांधलेल्या मार्केटवर हातोडा चालवून ते तोडले.
गुरुवार दि. २५ ऑगष्ट रोजी पाऊस नव्हता तरी कोंडी झाली. अशी कोंडी तर दररोज अनेकदा होते. सब वे वाहनांच्या कर्णकर्कश आवाजाने निनादत असतो. कोंडी झालेली वाहने क्यांव क्यांव करत आपला मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतानाचे दृश्य खूप त्रास देणारे असते. हे बघायला रेल्वेचे अधिकारी व लोकप्रतिनिधी कोणीच नसतात. पण मुकी बिचारी जनता कुणी हि हाका या न्यायाखाली दडपली गेल्याने आपली वाट शोधतांना धडपडत असते . दररोज सरासरी एखादा तरी नागरिक धडपडतो आणी अत्यंत कडवट प्रतिक्रिया देत पुढे सरकतो. एकीकडे केंद्र सरकार भविष्यातली आवाहने डोळ्यासमोर ठेवून प्रकल्पांची आखणी करत असतांना रेल्वेच्या ‘गेट बंद प्रकल्पा’ ने मात्र शहरातून जाणाऱ्या वाहतुकीचे भविष्य अंधारमय केले आहे.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर  शास्त्री जयंती साजरी.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंती साजरी.

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची...

read more
अहमदनगर कडून शिर्डी-येवला मार्गे मनमाडला राज्यमार्ग जातो या मार्गावर येवला आणि मनमाडच्या मधे जोडकिल्ले “अंकाई टंकाई”…

अहमदनगर कडून शिर्डी-येवला मार्गे मनमाडला राज्यमार्ग जातो या मार्गावर येवला आणि मनमाडच्या मधे जोडकिल्ले “अंकाई टंकाई”…

अंकाई टंकाई या जोडदुर्गा मधील अंकाईचा दुर्ग महत्त्वाचा आहे तसा टंकाई हा दुय्यम दुर्ग आहे मुख्य...

read more
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड व मनमाड बॉईज (क्लासिक बॉईज) यांच्या संयुक्त...

read more
आमदार सुहास कांदे यांच्याकडून  संत श्री सेवालाल महाराज मुर्तीपुजन व बंजारा समाज बांधव सन्मान सोहळा .

आमदार सुहास कांदे यांच्याकडून संत श्री सेवालाल महाराज मुर्तीपुजन व बंजारा समाज बांधव सन्मान सोहळा .

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून...

read more
महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात  कबड्डी स्पर्धा संपन्न

महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात कबड्डी स्पर्धा संपन्न

मनमाड: दिनांक ०१/१०/२०२२ रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय...

read more
कमलाबाई कासलीवाल विद्यालयात राष्ट्रीय पोषण माह उपक्रमांतर्गत इंद्रधनुष्य थाळी उपक्रम संपन्न

कमलाबाई कासलीवाल विद्यालयात राष्ट्रीय पोषण माह उपक्रमांतर्गत इंद्रधनुष्य थाळी उपक्रम संपन्न

राष्ट्रीय पोषण माह उपक्रमांतर्गत नांदगाव येथील कमलाबाई कासलीवाल विद्यालयात इंद्रधनुष्य थाळी उपक्रम...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]