मनमाड : (योगेश म्हस्के) गेल्या सहा दिवसांपासुन सुरु झालेला शारदीय नवरात्रोत्सव भाविक भक्त मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करत आहे.
मनमाड शहरात देखील अनेक नवरात्र मंडळे आणि देवी मंदिरामध्ये मोठ्या भक्ती भावाने आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करून नवरात्री साजरी केली जात आहे , शहरातील वेशीतील पुरातन असणारे शीतला माता मंदिरामध्ये देखील नवरात्री निमित्ताने शहरातील भाविक हजेरी लावत आहे. शहरातील काही जेष्ठ नागरिक सांगतात की वेशीमध्ये असणाऱ्या या शीतला देवी मंदिराला पुरातन असा इतिहास असुन हे मंदिर अनेक वर्ष जुने आहे. काही वर्षांपुर्वी या मंदिराचा जिर्णोद्धार झाला असुन शहरातील अनेक भाविक हे नवरात्री काळामध्ये शीतला मातेच्या दर्शनासाठी येत असतात.















