loader image
[ays_poll id=7]

संस्कारखेळवाडीत बालगितांची मेजवानी उपक्रम संपन्न

Aug 27, 2022


संस्कार खेळवाडी नेहमीच अभिनव उपक्रम राबवित असतात या उपक्रमातुनच बालकांच्या उपजत कलागुणांचा विकास होत असतो .

याच उपक्रमाचा भाग म्हणून संस्कारखेळवाडीतील माजी विद्यार्थिनी कु. कणक चव्हाण (सध्या नाशिक ६ वी)
या विद्यार्थिनीने गाणी शोधने ती चालीत म्हणणे आणि त्यांना सुंदर, सहज चाली लावण्याचा छंद जोपासला आहे, त्यासाठी कुठलेही प्रशिक्षण तिने घेतले नाही


संस्कारखेळवाडीत खास नाशिकवरून आपल्या बालकांसाठी गाण्यांची मेजवानी घेऊन आली या वेळी बालक – पालक उपस्थित होते, बालकांनी या गाण्यांचा आस्वाद घेतला तसेच पालकांच्या प्रश्नांची तिने छान उत्तरे दिलीत.
तीने बालगीते, विविध भाषेमधील जवळ जवळ निवडक २२ गाण्यांची मेजवानी सादर केली.त्या गाण्यांचा अर्थ ही उपस्थितांना सांगितला.
तसेच मुलांना मोबाईल -टिव्हीपासुन दुर करण्यासाठी कणकप्रमाणे मुलांनी छंद निवडुन कसा जोपासावा या बद्दल संस्कारखेळवाडीचे संचालक श्री अनिल चव्हाण सरांनी मार्गदर्शन केले.


हा पुर्ण सप्ताह माजी विद्यार्थीनी आपल्यातील उपजत कलागुणांचे सादरीकरण संस्कारखेळवाडीत करत आहेत.
उपक्रमाचे आयोजन सौ. कविता आहिरे, सौ. वैशाली भोसले, सौ. रुपाली बागुल, सौ. रूपाली गागरे, श्री उमेश कुलकर्णी यांनी केले .


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.