loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल & ज्यु. कॉलेज मध्ये शिक्षक- पालक संघाची स्थापना.

Aug 27, 2022


मनमाड : एच.ए.के. हायस्कूल & ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरीता शाळेचे मुख्याध्यापक श्री.भुषण शेवाळे सर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक- पालक संघाची स्थापना करण्यात आली.शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षपदी श्री.सैय्यद फरीद शाकीर यांची निवड करण्यात आली.यावेळी संस्थेचे सदस्या आयशा मो.सलीम अहमद गाजीयानी मॅडम व प्रत्येक वर्गातील पालक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी तसेच संस्था व शाळा समन्वयक श्री. अमोल निकम सर , पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर ,शेख आरीफ कासम व सर्व शिक्षक उपस्थित होते.
उपस्थित सर्व पालकांचे शाळेचे उपशिक्षक सैय्यद अफरोजोद्दीन सर यांनी स्वागत केले.शाळा व संस्था समन्वयक श्री. अमोल निकम सर व उपशिक्षक श्री जगताप शानुल सर यांनी शाळेच्या विविध उपक्रमा विषयी विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले.शाळेचे मुख्याध्यापक श्री. भुषण शेवाळे सर यांनी शाळेच्या विविध योजना,उपक्रमांची माहिती दिली. पालकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.शालेय शिक्षण,संगणक शिक्षण, सांस्कृतीक उपक्रम, परीक्षा,खेळ,शालेय निकाल इ.बाबत पालकांशी चर्चा केली.
शालेय शिक्षण विषयी विविध शंकांचे निरसन संस्था व शाळा समन्वयक श्री.अमोल निकम सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाळेचे उपशिक्षक श्री.सैय्यद अफरोजोद्दीन सर यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.