loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहरातील सौ. कमलाबाई माणिकचंद कासलीवाल विद्यालयात इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळा

Aug 28, 2022


नांदगाव : शहरातील सौ. कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक विद्यालयात शाडूच्या मातीपासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कशी बनवावी याचे कृतीयुक्त मार्गदर्शन श्री.फणसे सर यांनी केले.

शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मातीमुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. पर्यावरणाची कुठलीही हानी होत नाही याचे महत्त्व श्रीमती पठाण मॅडम यांनी पटवून दिले. तसेच विद्यालयाकडून विद्यार्थ्यांना शाडू माती पुरवण्यात आली.

शाळेने राबवलेल्या या कार्यक्रमाचे संस्थेचे चेअरमन मा.श्री.सुनीलकुमार कासलीवाल, सचिव विजय चोपडा, प्रशासक प्रकाश गुप्ता, सरचिटणीस प्रमिलाताई कासलीवाल,संचालक महेंद्र चांदिवाल ,मुख्याध्यापक श्री. व्ही. पी. सावंत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिद्धार्थ जगताप, विजय जाधव, अभिजीत थोरात ,श्रीमती,धन्वंतरी देवरे, जयश्री चोळके, अनिता पवार,वैशाली शिंदे, यांनी विशेष प्रयत्न केले.शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना शाडूच्या माती पासूनच बनवलेल्या मूर्ती घेण्याचे आवाहन करण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.