loader image
[ays_poll id=7]

नागापूरच्या आदिवासी बांधवांना शिधापत्रिकांचे वाटप

Aug 28, 2022


वर्षानु वर्ष रेशनकार्ड पासून वंचित असलेल्या आदिवासी वस्त्यांवरील कुटुंबांना घरपोच निशुल्क रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याची मोहीम आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून निरंतर सुरू आहे.


आज नागापूर तालुका नांदगाव येथील एकलव्य नगर पाची पुल वस्तीवरील 70 कुटुंबीयांना रेशन कार्ड ( शिधा पत्रिका) चे वाटप करण्यात आले.
अनेक वर्षांपासून रेशन कार्ड पासून वंचित असलेल्या आदिवासी समाज बांधव या वेळी आनंदाने भारावून गेला होता. कुटुंबातील प्रत्येक सदस्य रेशन कार्ड हातात घेऊन कुतूहलाने आनंदित होऊन पाहत होता.


आमदारांच्या माध्यमातून आज आपण रेशन कार्ड धारक झालो याचा आनंद त्यांच्या डोळ्यातून स्पष्ट जाणवत होता.
शिवसेनेचे आदिवासी समाज संघटक भाऊराव भाऊ बागुल यांनी गेल्या महिन्याभरापासून सर्व आदिवासी बांधवांचे कागदपत्र जमा करून रीतसर पाठपुरावा करून रेशन कार्ड तयार करून घेतले व आज वस्तीवरील एक छोट्याशा समारंभात कार्डचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी आमदार सुहास आण्णा कांदे यांचे प्रतिनिधी आदिवासी समाज संघटक भाऊराव बागुल, सरपंच नागापूर शिवसेना नेते सुधाकर पवार,गोविंद सोमासे,भीमराव पवार, लक्ष्मण खुरसने,पिंटू व्हडगर,रामदास सोनवणे, रोहित कूवर, लहू गायकवाड, नागू मोरे, बंसी सोनवणे, धनाजी तांबे, प्रकाश पवार, हिराबाई गोधडे, दत्तू पवार,अनिल खुरसने,अनिल सोनवणे पाचीपुल वस्ती एकलव्य नगर नागापूर येथील नागरिक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.