loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहरातील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

Aug 29, 2022

नांदगाव : नांदगाव शहरातील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हनून साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयातील शालेय क्रिडा मंत्री अनुष्का सोनवणे या विद्यार्थ्यीनीच्या हातून प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले. खेळल्यामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहते म्हणून आपण दररोज भरपूर खेळलेच पाहिजे. असा संदेश यावेळी देण्यात आला. या निमित्ताने शाळेत खो-खो, कबड्डी सामन्यांचे आणि रिले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पर्धेक विद्यार्थ्यांचा उत्साह अवर्णनीय होता.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. मनी चावला सर यांनी या कार्यक्रमानिमित्त विविध खेळांची माहिती दिली. क्रीडा शिक्षक अशोक बागुल यांनी हॉकी खेळाचे नियम समजावून मेजर ध्यानचंद यांची हॉकी खेळातील जागतिक कामगिरीची माहिती दिली.
सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त संस्थेचे चेअरमन श्री. सुनीलकुमार कासलीवाल तसेच संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा, जुगलकिशोर अग्रवाल, रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदीवाल,सर्व पदाधिकारी, प्रशासन अधिकारी प्रकाश गुप्ता, प्रिन्सिपल मनी चावला सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
.