loader image
[ays_poll id=7]

क्रीडा दिनानिमित्त छत्रे विद्यालयाच्या माजी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान व वेट लिफ्टिंग प्रात्यक्षिक

Aug 29, 2022


हॉकी चे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ साजरा होणाऱ्या क्रीडा दिनानिमित्त छत्रे विद्यालयाच्या माजी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान व 5वी ते 7वी च्या विद्यार्थ्यांसमोर खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने वेटलिफ्टिंग प्रात्यक्षिक दाखविण्यात आले जय भवानी व्यायामशाळा व छत्रे विद्यालयाच्या 10 ते 15 वर्षे वयोगटातील खेळाडूंनी स्नॅच व क्लिन जर्क चे अतिशय उत्तम प्रकारे सादरीकरण करीत सर्वांची वाहवा मिळविली आंतरराष्ट्रीय स्तरावर वेटलिफ्टिंग मध्ये मनमाड शहरातून पदक विजेते खेळाडू व प्रशिक्षक तयार होत असल्याने वेटलिफ्टिंग कसा खेळला जातो याची शाळेतील मुलांमध्ये उत्सुकता होती


आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद आहेर राष्ट्रीय खेळाडू नूतन दराडे,खुशाली गांगुर्डे, संध्या सरोदे,धनश्री बेदाडे यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला
मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या
या प्रसंगी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सचिव दिनेश धारवाडकर, मुख्य लिपिक अविनाश भोसले,क्रीडा शिक्षक हरीश चंद्रात्रे व सकाळ सत्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते
छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांनी प्रास्ताविक करीत खेळाचे व व्यायामाचे महत्त्व या विषयी मार्गदर्शन केले संतोष कोकणे,निलेश जाधव,सौ एस डी पवार मंगेश कानिटकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.