loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहर मराठी पत्रकार संघाच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त ‘घरगुती पर्यावरणपुरक देखावा स्पर्धेचे’ आयोजन

Aug 30, 2022


मनमाड : मनमाड शहरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो यानिमित्ताने घरोघरी गणेशाची स्थापना करून विविध देखावे साजरे केले जातात मात्र पर्यावरणाचे महत्व पाहता घरातील मुलांवर पर्यावरण वाचवण्याचे संस्कार व्हावे यासाठी मनमाड शहर मराठी पत्रकार संघाच्या वतीने गणेशोत्सव काळात घरगुती पर्यावरण पुरक देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुका समन्वयक अमोल खरे यांनी दिली.

मराठी पत्रकार परिषद, मुंबई संलग्नित नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर मराठी पत्रकार संघ नियमितपणे सामाजिक बांधिलकी जपत समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करत असते ,यंदाच्या वर्षी गणेश उत्सवानिमित्ताने घरगुती पर्यावरणपुरक आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मनमाड शहरात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो यानिमित्ताने गणेश स्थापना केल्यानंतर घरोघरी आकर्षक मनमोहक देखावे आरास केली जाते सध्या पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असून याकडे देखील सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे पर्यावरण वाचले तर मनुष्य वाचेल यासाठी घरातच मुलांच्या मनावर पर्यावरण रक्षणाचे संस्कार व्हावे यासाठी मनमाड शहर मराठी पत्रकार संघाच्या वतीने गणेशोत्सव निमित्त घरगुती पर्यावरणपुरक देखावा स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत पर्यावरण रक्षण संरक्षण जतन महत्वाचे आहे हीच थीम घेऊन या सर्व स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी दिनांक ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर पर्यंत आपल्या घरगुती देखाव्याचे संपुर्ण छायाचित्र काढुन स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा , स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांचा संपुर्ण देखावा हा पर्यावरण पुरक असावा , पत्रकार संघाच्या कुठल्याही सदस्यांना यात सहभाग घेता येणार नाही. या सर्व स्पर्धेचे परीक्षकांच्या वतीने निरीक्षण करण्यात येणार असुन परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धेतील विजयी स्पर्धाकांना प्रथम , द्वितीय , तृतीय आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहे.

या स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांनी पत्रकार संघाचे सदस्य योगेश म्हस्के मो.8149888554 , अशोक बिदरी मो. 9511659594 , निलेश व्यवहारे मो.9270121272 , गणेश केदारे मो.8483903988 , उपाली परदेशी मो.9226727877 या नंबरवर देखाव्याचे फोटो पाठवुन आपला स्पर्धेतील सहभाग नोंदवावा असे आव्हान मनमाड शहर मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आलेले आहे. त्यात खाली जोडा देणे
सहभागी सर्व स्पर्धकांच्या देखाव्यांना दैनिक जनश्रद्धा मधून प्रसिद्धी दिली जाईल


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.