मनमाड – मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द असणार्या वेशीतील श्रीनिलमणी गणेश मंदीरात सन 1997 पासून सलग 26 व्या वर्षी श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे बुधवार दिनांक 31/08/2022 ते शुक्रवार दिनांक 9/09/2022 या कालावधीत सलग 10 दिवस भाद्रपद महागणेशोत्सवाचे आयोजन यंदाही कोरोना संकट नंतर संबंधित सर्व शासकीय नियमां चे काटेकोर पालन करून मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे. मनमाड शहराच्या धार्मिक सामाजिक सांस्कृतिक ,सेवाकार्य परंपरेमध्ये मानाचे स्थान असणार्या आणि आम्ही परंपरा पाळतो……! आम्ही संस्कृतीचे रक्षण करतो…..! हे ब्रीदवाक्य घेवून सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या उत्सव परंपरेला साजेसा असणारा उत्सव निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे गत 25 वर्षा पासून साजरा केला जातो. परंतु यंदा हे गणेशोत्सव चे 26 वें वर्ष आहे या मनमाड शहरातील मानाच्या महा गणेश उत्सवात सर्व श्री गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे नम्र आवाहन श्री नीलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे करण्यात येत आहे मान्यवर पुरोहितांच्या मार्गदर्शन मध्ये होणारी श्री निलमणि ची महाआरती भक्तांना दररोज रात्री ठीक 8 -00 वाजता श्री निलमणी गणेश मंदिर मनमाड या फेसबुक पेज वरुन लाइव पहाता येणार आहे या महाआरती चा नित्य लाभ घेणे साठी सर्व गणेश भक्तां नी वरील फेसबुक पेज त्वरित लाइक करावे आणि इतर भक्तांनाही सांगावे सन 2017 पासून श्री नीलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्ण च्या सेवे साठी सुरू करण्यात आलेला शिल्लक औषध केंद्र उपक्रम यंदाही सलग 06 वे वर्षी सुरु राहणार आहे सर्व नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी आपले कडे असणाऱ्या शिल्लक औषधे की ज्यांची एक्सपायरी शिल्लक आहे अश्या औषधि देणे साठी 8668954060 या मोबाइल नम्बर वर संपर्क करावा ही औषधे ट्रस्ट आपले कडून संकलित करेल मनमाड शहर व परिसरातील सर्व गणेशभक्त नागरिक, बंधु भगिनींनी यंदाचा भाद्रपद गणेश उत्सव उत्साहात साजरा करावा शासन, पोलिस प्रशासन यांना सहकार्य करावे ,मास्क लावा सामाजिक अंतर पाळा असे नम्र विनंती/ आवाहन श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे विश्वस्त मंडळाने केले आहे.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











