नांदगांव ( सोमनाथ घोंगाणे ) : तालुक्यातील कळमदरी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून पालकांनी शाळेला टाळे लावले .आर टी ई कायद्यानुसार १/२००९ (राईट टु एक्यकेशन, )शिक्षण नियमा नुसार ६ ते १४ या वयातील मुलामुलींना मोफत शिक्षण ,हे अधिकार सर्व भारतात २००२ मध्ये लागू झाले असतांना विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणारे वेतन घेणारे गुरुजी जर वर्गात झोपा काढत असेल ? तर या चिमुकल्यांचा शिक्षणाचा पाया कसा भक्कम होईल ? काही शिक्षकांची मुले खाजगी शाळेत शिकतात ?याची कारणे देखील हीच असू शकतात ?
एखाद्या विषयावर जर काम झाले नाही तर मग सहज पणे बोलले जाते तुम्ही काय झोपा काढतात का?
जेव्हा गुरुजी झोपा काढतात ? तेव्हा काय संतापलेल्या पालकांनी कळदरी जि प शाळेला लावले टाळे.
नांदगांव कळमदरी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मनमानी करतात. नियमित शाळेत येत नाही त्यांच्या कामकाजात दिरंगाई दिसून येते.शिक्षणाचा विस्कळीतपणा ,कामकाजात अनियमित पणा या संदर्भात वरिष्ठांकडे लेखी तोंडी तक्रारी करुन दखल न घेतल्याने नागरीकानी व शिक्षण समितीच्या वतीने आंदोलन छेडीत जिल्हापरिषद कळमदरी प्राथमिक शाळेला टाळे लावले . या घटनेने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे .
दि १ सप्टेबर रोजी नागरिकांनी जि प प्राथमिक शाळेला टाळे लावल्याने पंचायतसमीती विभाग खडबडुन जागा झाला आहे नागरिकांनी मुख्याध्यापक सुरेश उत्तंम बागुल हे शाळेत झोपा काढतात शिवाय अनियमितपणा असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचे परिणाम झाले .या बाबत सरपंच,ग्रा प सदस्य,शिक्षण समीती यांनी ग्रांमपंचायत मध्ये ग्राम सभा घेऊन मुख्यध्यापका विरोधात ठराव पास करुन त्यांच्या बदलीची मागणी केली होती पण त्याची पुरेशी दखल
शिक्षण विभाग नांदगांव यांनी घेतली नाही. वेळेत निर्णय शिक्षण अधिकार्यांनी न घेतल्याने नागरिकांनी कळमदरी जि प प्राथमिक शाळेला ताळे लाऊन तेथेच एक दिवसीय आंदोलन छेडले आता मुख्यध्यापकाच्या निलंबनाची मागणी ग्रामस्थांनी केली तसे निवेदन शिक्षण विभाग पंचायत समीती नांदगांव यांना देण्यात आले असून शाळेला कुलूप लाऊन ठेवले आहे .दरम्यान पर्यायी शिक्षक देण्याचा शब्द दिला. पण ते ग्रामस्थांनी नाकारले ग्रामस्थ आता मुख्यध्यापकाच्या निलंबनाच्या मागणीवर कायम आहे.ग्रामस्थांनी मुख्यध्यापकाच्या कामकाजात सुधारणा करण्यास वेळ दिली पण सुधारणा झाली नाही.
सदर निवेदनावर ग्रामस्थ शेखर पगार,देविदास पगार,पुरूषोत्तम पगार,सदाशिव देसले,सुनिल पगार ,नानासाहेब गरुड,विजय पगार,समाधान पगार,बबन देवरे,प्रवीण पाटील,दर्शन पगार,अरुण पगार,विनोद सुर्यवंशी,ऋषीकेश देसले,चेतन पगार,अरुण देवरे,राहुल पगार यांच्या निवेदनावर सह्या आहेत.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











