loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – अन्यथा महावितरण कार्यालयातील दूरध्वनी संचच फोडू, गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिला इशारा

Sep 2, 2022


ऐन गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मनमाड शहरातील काही भागात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत थेट एफ सी आय रोड येथील महावितरण च्या कार्यालयात धडक देत जाब विचारला. शहरात होणारा खंडित वीजपुरवठा ही नित्याचीच बाब झाली असून महावितरणच्या ह्या कारभाराला जनता विटली आहे.पावसाळा सुरू होण्याअगोदर मोठ्या प्रमाणात वीजवाहक तारांच्या कामासाठी ८ ते १० तास वीज पुरवठा खंडित करणाऱ्या महावितरण ला अखंडितपणे वीज पुरवठा का करता येत नाही? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. विचारणा करण्यास दूरध्वनी क्रमांकावर फोन केल्यास उडवा उडवीची उत्तरे नागरिकांना दिली जातात तर बऱ्याच वेळा रिसिवर बाजूला ठेवला जातो. काल सायंकाळ पासून आय यु डी पी भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने दोस्ती गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालय गाठत जाब विचारला.संबंधित अधिकाऱ्यांनी मोबाईल बंद केल्याने कार्यकर्त्यानी तीव्र नाराजी व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या. दूरध्वनी क्रमांकावर जर वीज ग्राहकाच्या शंकेचे तसेच तक्रारीचे निवारण होणार नसेल तर तो दूरध्वनी संच काय कामाचा ? असा सवाल युवा सेनेचे अमोल दांडगव्हाळ यांनी उपस्थित केला असून महा वितरण ने आपल्या कामकाजात बदल न केल्यास कार्यालयातील दूरध्वनी संचच फोडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.