loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडिओ) विजेचा लपंडाव ; शिवसेना कोअर कमिटी सदस्यांनी विचारला महावितरण अधिकाऱ्यांना जाब

Sep 3, 2022


आमदार सुहास (आण्णा) कांदे यांच्या मार्गदर्शनाने मनमाड शहर कोअर कमिटीच्या वतीने कार्यकारी उपअभियंता मा.शिंदे साहेब यांना कार्यालयात निवेदन देण्यात आले.
मनमाड शहरामध्ये विविध गणेश मंडळांनी आकर्षक देखाव्यांसह “श्रीं” गणरायाची स्थापना केलेली आहे. आणि हिंदू धर्मातील एक अतिशय महत्त्वाचा असा मानल्या जाणाऱ्या गणेश उत्सवाच्या काळातच वीज पुरवठा खंडित होत असल्या कारणाने भक्त भाविकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागल्याचे मागील काही दिवसात निदर्शनास आले असता सदर बाब महावितरणच्या लक्षात आणून देऊन शिवसेना कोअर कमिटी तर्फे जाब विचारण्यात आला तसेच तातडीने वीज पुरवठा खंडित होणार नाही यावर उपाययोजना करण्यात याव्या.
मा.शिंदे साहेबांनी यापुढे उत्सवाच्या काळात विज पुरवठा खंडित होणार नाही याची हमी घेण्यात आली तसेच मिरवणुकीच्या दरम्यान विद्युत कर्मचारी यांची ड्युटी लावुन विद्युत वाहिनी मुळे मिरवणुकीस अडथळा होणार नाही असे आश्वासन दिले.

याप्रसंगी शिवसेना कोअर कमिटी सदस्य राजाभाऊ भाबड, सुनील हांडगे, वाल्मीक (आप्पा) आंधळे, योगेश इमले, विकास वाघ, लोकेश साबळे, जाफर मिर्झा, महेंद्र गरुड, अज्जूभाई शेख, सचिन दरगुडे, आसिफ शेख, कुणाल विसापूरकर, सुनील ताठे, रोहित ताठे, अजिंक्य साळी, कलश पाटेकर आदीसह शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते .


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.