loader image
[ays_poll id=7]

मनमाड – चांदवड – लासलगाव चौफुली प्रवेशद्वार जवळ नवीन डी पी बसवण्याची शिवसेनेची मागणी

Sep 4, 2022


मनमाड – लासलगाव – चांदवड चौफुली येथील प्रवेशव्दाराजवळ डि.पी.बसविणे तसेच निंबाळकर चाळ येथे सातत्याने विज खंडीत होत असून येत्या सात दिवसात प्रश्न मार्गी न लागल्यास शिवसेनेतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन शिवसैनिकांनी येथील कार्यकारी अभियंता संजय तडवी यांना दिले.
मनमाड – लासलगाव – चांदवड चौफुली येथे गुरुव्दारातर्फे भव्य धार्मिक प्रवेशव्दार बांधण्यात आले आहे.याठिकाणी विधानपरिषद व शिवसेनेचे आमदार नरेंद्रजी दराडे यांच्या विकास निधीतून हायमास्ट बसविण्यात आले आहे.मात्र हायमास्ट सुरु रहाणे कामी याठिकाणी १५ के.व्ही.क्षमतेचा ट्रान्सफर असणे आवश्यक आहे.तो नसल्याने मायमास्ट बसवून सुमारे १० ते १२ महिने झाले तरी सुरु झालेले नाही.प्रवेशव्दार परिसर हा सार्वजनिक असल्यामुळे याठिकाणी रात्रीच्या सुमारास अनेक समस्यांना नागरीकांना व वाहनधारकांना सामोरे जावे लागत आहे.अपघात देखील होत आहेत.तात्काळ याठिकाणी १५ के . व्ही . सिंगल फेज क्षमतेचा ट्रान्सफर बसविण्यात यावा जेणेकरुन मायमास्ट सुरु होऊ नागरीकांना सोईचे होईल.न.पा.माध्यमातून स्ट्रिट लाईटवरुन हायमास्टला मिटर देण्यात यावे नगरपालिकेने तशी संमती आहे.तसेच शहरातील गुरुव्दारा समोर निंबाळर डि.पी. असून रोज विज पुरवठा खंडीत होत असल्याने हा प्रकार नेहमीचाच असल्याने विजग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सध्या गणेशउत्सव सुरु असल्याने घराघरात गणपती विराजमान झालेले असून रोषणाई आहे त्यामुळे विज खंडीत च्या प्रकाराने अंधाराचे साम्राज्य होत आहे . सदर प्रकार हा येथील डि.पी. चा फिडर हा हुडको ला जॉइंट केल्याने भार वाढून विज पुरवठा खंडीत आहे तेव्हा याडिपी वरील लोड कमी करण्यात येऊन येथील विज पुरवठा सुरळीत ठेवावा व नागरीकांना दिलासा द्यावा ही विनंती . तसेच शहरातील सर्व भागातील वायरमन यांचे नाव मोबाईल नंबर व्हॉटस्अॅप ग्रुप व वर्तमानपत्रास प्रसिध्द करावे जेणे करुन विज खंडीत झाल्यास वायरमन यांना संपर्क करुन तक्रारनिवारण होईल . सदर बाबींची त्वरीत दखल घेऊन कार्यवाही व्हावी अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलन छेडण्यात येईल असे दिलेले निवेदनात म्हटले आहे.
दिलेल्या निवेदनावर शिवसेना सहसंपर्कप्रमुख अल्ताफ खान, प्रवीण नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद,जिल्हा संघटक संजय कटारिया, शहर प्रमुख मयूर बोरसे, प्रवीण सूर्यवंशी, स्वराज्य देशमुख, प्रवीण धाकराव, योगेश देशपांडे, शैलेश सोनवने, लियाकत शेख, अनिल दराडे, विजय मिश्रा,माधव शेलार आदि पदाधिकारी व शिवसैनिकांनी स्वाक्षरी केले आहेत.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.