नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : राज्यातील २८१ बाजार समिती निवडणुक कार्यक्रम डॉ. पी. एल. खंडागळे सचीव राज्य निवडणुक प्राधीकरण यांनी जाहीर केला.
राज्यात भाजपा / शिदें यांचे सरकार आल्यावर बाजार समितीच्या निवडणुका सोसायटी संचालक तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या गटातून न घेता शेतकरी मतदारा मधून घेण्याची घोषणा झाली होती. पंरतू आज जाहीर झालेल्या निवडणुक कार्यक्रमात सोसायटी व गामपंचायत सदस्या मधून यादी तयार करण्याचे पत्रक निघाल्याने प्रस्थापीत पुढारी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
सदर निवडणूक २९ जानेवारी २०२३ रोजी होणार असून . निवडणुक कार्यक्रम २३ डिसेंबर २०२२ पासून सुरू होणार आहे.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











