आमदार सुहास कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील रौनक सोशल फाउंडेशनच्या वतीने शहरात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शासकीय विश्रामगृह मनमाड येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.आधुनिक पद्धतीने रुग्णांची विनामूल्य आरोग्य तपासणी या शिबीराद्वारे करण्यात आली. या प्रसंगी आमदार पत्नी सौ.अंजुम कांदे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या रौनक फाउंडेशनच्या कार्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.

या शिबिराचे आयोजन रौनक सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. वर्षा झालटे यांनी केले होते. तर या शिबिरासाठी बालरोगतज्ज्ञ डॉ रवींद्र राजपूत, डॉ उम्मेहानी रसूल, डॉ माजिद अन्सारी, डॉ मोहम्मद इमरान, डॉ संदीप सुरसे आदी उपस्थित होते.












