loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरात कायमस्वरूपी निर्माल्य संकलन केंद्र निर्माण करावे :: श्री निलमणी गणेश मंदिर ट्रस्ट ने केली मागणी

Sep 7, 2022


मनमाड शहरात संपूर्ण वर्षभरात विविध धार्मिक उत्सव मोठया प्रमाणात साजरे होतात विशेषतः सार्वजनिक गणेशोत्सव,सार्वजनिक नवरात्रौत्सव सर्वच देवी देवता,महापुरुष यांचे जयंती , पुण्यतिथी तसेच घरगुती स्वरूपातील घार्मिक कार्यक्रम होत असतात दरवर्षी मनमाड शहरात लहान मोठी मिळून सुमारे १३० ते १५० लहान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापना करतात तर सात हजार पेक्षा जास्त घरगुती गणेश स्थापना होतात त्याच प्रमाणे दरवर्षी शहरात लहान मोठी मिळून ४० पेक्षा जास्त नवरात्र उत्सव मंडळा ची स्थापना होते तर घटस्थापना तर सर्व च घरात होते मनमाड शहरात सार्वजनिक व खाजगी मालकीची ११२ पेक्षा जास्त मंदिरे आहेत या सर्व धार्मिक कार्यक्रम मध्ये संपूर्ण वर्षभर फुल , हार व इतर पूजा साहित्यांचे वापरा नंतर निर्माल्य मध्ये रुपांतर होते हे वर्षभर निर्माण होणारे निर्माल्य नागरिक शहारातील रामगुळणा, व पांझण या नद्या न मध्ये विसर्जित करतात शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या या दोन्ही नद्या , विशेषतः श्री दत्त मंदिर परिसरातील दशक्रिया घाट परिसर या निर्माल्य विसर्जना मुळे अत्यंत प्रदूषित झाला आहे या पुरातन मंदिर परिसराची दुरावस्था झाली आहे शहरात काही सामजिक संस्था उत्सव काळात तात्पुरत्या स्वरूपात निर्माल्य संकलन चे कार्य करतात परंतु त्यामुळे ही नदी प्रदषणमुक्त करण्याची समस्या संपत नाही म्हणून मनमाड नगर परिषद ने पुढाकार घेऊन सार्वजनिक श्री गणेश विसर्जन कुंडा जवळ कायम स्वरूपी निर्माल्य संकलन केंद्र निर्माण करावे अशी मागणी निवेदनाद्वारे श्री निलमणी गणेश मंदिर ट्रस्ट ने माननीय सचिनजी पटेल मुख्याधिकारी मनमाड नगर परिषद यांचे कडे केली आहे तसेच मनमाड नगर परिषद ने शहरातील सर्व धार्मिक स्थळे व नागरिकांना याच निर्माण केलेल्या निर्माल्य संकलन केंद्रात निर्माल्य देणे साठी कडक नियमावली तयार करावी अशी सूचना ही ट्रस्ट ने केली आहे यावेळी श्री निलमणी गणेश मंदिर ट्रस्ट चे सचिव नितिन पांडे , विश्वस्त शेखर पांगुळ, गोविंद रसाळ, निलमणि गणेश मंडळ चे भरत छाबडा,संदीप शिनकर महेश बोराडे,मनमाड नगर परिषद चे मुख्य आरोग्य अधिकारी विजयकुमार सोनवणे उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.