loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – मनमाड शहरात गणेशभक्तांकडून आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप

Sep 10, 2022

मनमाड : (योगेश म्हस्के)दोन वर्षांच्या निर्बंधांमुळे यंदा गणेशोत्सवाचा उत्साह गणेशभक्तांमध्ये काही वेगळाच दिसुन आला , घरगुती गणपतीसह मंडळाच्या गणपतीमध्येही उत्साह दिसून येत होता. बाप्पाची दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांच्या वतीने भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पांचा विसर्जन सोहळा संपन्न झाला.

शहरामध्ये काल विसर्जन सोहळ्या प्रसंगी जोरदार मुसळधार पावसाचे देखील आगमन झाले होते , परंतु या पावसामध्ये देखील अनेक नागरिकांनी आपल्या बाप्पाचे अत्यंत मनोभावे विसर्जन पार पाडले. सकाळी मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि वेशीतील मानाचा गणपती श्री निलमणी गणेशाची पारंपरिक पद्धतीच्या मिरवणूकने विसर्जन सोहळा संपन्न झाला. शहरातील अनेक मानाची गणेश मंडळे , घरगुती गणपती यांचे मध्यरात्री पर्यंत गणेशकुंड येथे विसर्जन संपन्न झाले.

यंदाच्या वर्षीच्या विसर्जन सोहळ्यामध्ये सर्वात आगळी-वेगळी विसर्जन मिरवणूक ठरली ती गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळाच्या ‘गोदावरीचा राजा’ गणपतीची , गेल्या 26 वर्षांपासून मनमाड ते मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांकडुन कदाचित देशातील एकमेव असणारा चालत्या प्रवासी रेल्वेगाडी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पुर्ण झाल्याने मिरवणुकीमध्ये या मंडळाच्या वतीने 75 मीटरलांब ध्वज तयार करून मिरवणुकीमध्ये सहभागी मंडळाच्या महिला आणि पुरुष सदस्यांनी पारंपरिक वेशभूषा व डोक्यावर फेटे परिधान करून बाप्पांच्या पुढे ध्वज हातामध्ये धरून , डी.जे.वर वाजणारे देशभक्तीपर गीत आणि ढोल-ताशांच्या गजरामध्ये बाप्पाची अत्यंत सुंदर आणि शिस्तबद्ध मिरवणूक काढुन मनमाडकरांची मने जिंकली.

अजून बातम्या वाचा..

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :-लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड,लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व कॅन्सर सेंटर अमेरिका (CCA)...

read more
मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश महात्मा गांधी...

read more
भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भारतीय जनता पक्ष राजकारण करीत असताना सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजपयोगी उपक्रम राबवित असते याच...

read more
जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे संपन्न झालेल्या १९ वर्ष आतील मुले मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने )...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

मनमाड -येथिल सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, 'शिक्षक दिन ','श्री चक्रधर स्वामी अवतार दिन' तसेच 'मदर...

read more
.