loader image
[ays_poll id=7]

अन्यथा मनमाड चे ज्येष्ठ नागरिक करणार आमरण उपोषण

Sep 13, 2022


मनमाडकर नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधा बाबत ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीच्या आंदोलनाचा आज दुसऱ्या दिवशी ही नगरपालिका प्रशासनाने दखल घेतली नसून उडवा उडवी ची उत्तरे देऊन समितीची दिशाभूल करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. दिनांक १२ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर धरणे आंदोलन असून १५ सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. शहरातील नागरिकांच्या सोयीसुविधा बाबत जो पर्यंत युद्धपातळीवर नगर पालिका प्रशासन निर्णय घेत नाही तो पर्यंत ” मरो या तरो ” असा ठाम निर्णय अध्यक्ष राजाभाऊ पारीक, नरेंद्र कांबळे,दिलीप आव्हाड,एस.एम. भाले यांनी घेतला आहे.आंदोलनात पांडुरंग पगारे,रामभाऊ गवळी, श्रीकांत साळसकर, आर. बी धेंगळे,गोपीनाथ गायकवाड आदी उपस्थित होते. आज आंदोलनाला प्रामुख्याने पाठिंबा दर्शविणाऱ्या काँग्रेस चे अशोक व्यव्हारे, आर पी आय चे राजेंद्र आहिरे, गंगा दादा त्रिभुवन, आर.पी. निळे,सुरेश शिंदे, किसान सभा जिल्हा सचिव विजय दराडे, अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायत प्रदेश सचिव प्रकाश चावरीया,प्रदेश संघटक बबलू लोहरे, राष्ट्रवादी सेवादल अध्यक्ष राजाभाऊ जाधव यांनी पाठिंबा दर्शविला.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.