loader image
[ays_poll id=7]

शिवसेनेचे मयूर बोरसे यांचा शहर प्रमुख पदाचा राजीनामा

Sep 14, 2022

मनमाड शहर शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मी शिवसैनिक असून पक्षाच्या आदेशाचे पालन करीत आलो आहे परंतु कौटुंबिक कारणामुळे मी शिवसेना शहर प्रमुख पदाचा राजीनामा जिल्हा पदाधिाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे मात्र मी पक्षात कायम असल्याचे बोरसे यांनी सांगितले. नाशिक जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांच्याकडे दिलेल्या राजीनाम्यात श्री बोरसे यांनी म्हटले आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या धगधगत्या विचाराने प्रेरित होऊन माझी बाल शिवसैनिक या पदापासून शिवसेनेशी नाळ जोडली गेली नंतर शाखा प्रमुख पदापासून सुरू झालेला पक्ष कार्याचा प्रवास शहरप्रमुख पदापर्यंत सुरू होता. या वाटचालीत प्रत्येक आंदोलन,मोर्चा,सभांच्या माध्य मातून जनहितासाठी अग्रेसर राहिलो आहे.पक्ष संघटनेच्या कार्यात खारीचा वाटा उचलला.शहर प्रमुख पदाच्या कार्यकाळात पक्षाची प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली मात्र कौटुंबिक कारणामुळे या पदाला वेळ देता येत नसल्यामुळे शहरप्रमुख पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे असे पत्रात नमूद केले आहे.

अजून बातम्या वाचा..

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

  नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्यशासनाने ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या...

read more
बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

चांदवड - चांदवडला कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलनचा आजचा चौथा दिवस असून...

read more
बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

  नांदगाव: मारूती जगधने नांदगांव नजिक गंगाधरी येथे विहीरीत पडलेल्या उदमांजराला पशुप्रेमीनी/...

read more
.