नांदगाव सोमनाथ घोंगाणे
नांदगाव शहर व परिसरात चोरीच्या घटना सुरूच आहेत.गेल्या दोन आठवड्यात नांदगाव पंचक्रोशीत आठ ते दहा ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या असून चोरांना वचक बसविण्यासाठी पोलीस गस्त वाढविण्याची मागणी होत आहे .चोरीचे सत्र वाढल्याने नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे. नांदगांव शहराजवळील श्रीरामनगर ग्रामपंचायत हद्दीत संत जर्नादन स्वामी नगर मध्ये काल रात्री भरपावसात चोर चोरी करुन पसार झाले . येथील दिनेश पिंगळे यांच्या घराचे दोन कुलपे तोडून चोरांनी आता प्रवेश करुन सुमारे पाचतोळे सोने व ३० हजार रुपये रोख रकमेसह सुमारे २ लाख ८० हजार रुपयांची चोरी दि १२ / ९/२२ रोजी रात्री ३ ते ४ वाजता झाली या घटनेने जर्नादन नगर मध्ये खळबळ उडाली .याबाबत सविस्तर असे की जर्नादन स्वामी नगर मधील नागरीक रात्री झोपेत असतांना पिंगळे यांना रात्री ३ वा घराच्या बाजूला खाडखाड ,टकटक,असा आवाज आला तेव्हा त्यांनी संपुर्ण घराचे दरवाजे आतुन बंद असल्याचे बघितले व ते पुन्हा झोपी गेले . नंतर पहाटे ४ वा भ्रमणध्वणीवरील बेल वाजली असता पिंगळे यांना गावी जायचे असल्याने झोपेतुन उठले तेव्हा बघितले तर घराचे मुख्यदरवाजे उघडलेले होते. तेव्हा त्यांनी घराची पाहणी केली असता किचन मधील वस्तूची सांडलवंड झालेली व बेडरुमधील कपाट तोडून त्यातील रोकड,आणी देव्हार्यातील महिलांचे नियमित वापरातील सोन्याचे दाग दागिने या मौल्यवान वस्तुंची चोरी झालेली होती.चोरांनी दर्शनी भागावरील चायना गेटचे ताळे तोडून बेड,किचन, दरवाजे उघडले होते.पाचतोळे सोने पावतीसह चोरून कपाटातील ३० ह रु रोख ( सोने . ,पांचाली,कानातले वेल,व इतर दागिने, लहान मनी असलेल्या पोत,आदी) पसार केले. याच दरम्यान येथील सुमनबाई भिका खटके यांच्या घराचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडल्याचा आवाज येताच सुमनबाई खटके यांच्या मुलाला जाग येताच चोर तेथून पसार झाले .याच रात्री चोरांनी फुलेनगरचे बाबुराव जेजुरकर यांच्या घरी देखील किरकोळ साहित्याची चोरी केली या दरम्यान संत जर्नादन स्वामी नगर मध्ये CCTV चेक केले असता चोरांनी CCTV चे हायमास्ट बंद केलेले आढळले शिवाय इतर ठिकाणच्या CCTV कॅमेरानां चकवा देत चोरटे चोरी करुन पसार झाले .
दरम्यान सात दिवसापूर्वी शहरातील पोलीस स्टेशन जवळील हाकेच्या अंतरावर रहदारी बंगल्या समोर एकाच रात्री चोरांनी तीन दुकाने फोडुन मौल्यवान वस्तूंची सव्वा लाखाची चोरी केली त्या घटनेचा तपास लागण्या पूर्वीच श्रीरामनगर हद्दीतील संत जर्नादन स्वामी नगर मध्ये धाडसी चोरी झाली .
श्रीराम नगर हाद्दीतील हॉटेल चांदनी गार्डन येथेही यापूर्वी चोरांनी तीनवेळा धाडसी चोरी केली पण त्याचा ही अद्याप तपास लागला नाही चोरीचा तपास लागत नसल्याने चोरीचे प्रमाण वाढील लागल्याचे बोलले जाते. सतत होणाऱ्या या चोरी घरफोडी मुळे चोरांनी जणु पोलिसांना आव्हान दिले की काय असा प्रश्न निर्माण नागरीक विचारत आहे.

प्रतिक्रिया
अतुल निकम ग्रामपंचायत सदस्य
चोर हुशार असून शातीर असल्याने त्यांनी हायमास्ट बंद केले तसेच चोरानीं रेकी करून चोरी केलेली असावी. नागरिकांनी स्व: सुरेक्षेकरीता घरासमोरील व दुकानासमोरील लाईट रात्री चालू ठेवावे.













