देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सव अंतर्गत गरोदर महिलांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेण्याची केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोग तज्ञांमार्फत गरोदर मातांची मोफत तपासणी समुपदेश व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते.
ह्या शिबिरात शहर परिसरासोबत संपूर्ण तालुक्यातील ४४ गरोदर महिलांची या तपासणी झाली.तसेच ३१ गरोदर महिलांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली व २५ गरोदर महिलांना सोनोग्राफीसाठी पाठविण्यात आले.२८ महिलांना कुटूंब नियोजनबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन वारके आणि स्त्री रोग तज्ञ डॉ.लता वेडेकर यांनी गरोदर मातांची तपासणी केली व उपचार केले.
मनमाड शहरातील प्रथम मानाच्या श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना
पालखी मिरवणुक पारंपरिक पद्धतीने उत्साहात संपन्न मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला...












