loader image

नांदगाव पोलीस स्थानकातील हवालदार व पोलीस शिपाई अखेर ए .सी .बी च्या जाळयात

Sep 14, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव तालुका हा भष्ट्राचारा साठी व अवैध धंदयासाठी कुप्रसिध्द असून कायम ए.सी. बी . च्या रडारवर आहे. तहसिल कार्यालय, पंचायत समिती,भुमी अभिलेख,विज वितरण कंपनी, यासह इतर सर्व शासकीय विभागातील अधिकारी / कर्मचारी एसीबी कडून रंगेहाथ पकडले गेले आहे. यात एक विभाग नेहमीच टळत होता . तो म्हणजे पोलीस विभाग पंरतू याच विभागातील दोन महाभाग काल रात्री उशीरा झालेल्या कारवाईत अलगद ए. सी. बी च्या जाळयात अडकले.
याबाबत अधीक माहीती अशी की तक्रारदार पुरूष वय २२ वर्ष याच्या तक्रारी वरून आलोसे १) सुरेश पंडीत सांगळे (वय ५४) व्यवसाय नौकरी पोलीस हवालदार नेमणुक नांदगाव पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण २) अभिजीत कचरू उगलमुगले (वय २९ ) व्यवसाय नौकरी पोलीस शिपाई नेमणुक नांदगाव पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण यांना रूपये ३५००० /- ची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली.
यातील आलोसे क्र. १ यांनी नांदगाव पोलीस ठाणे येथे तक्रारदार यांचा वाळूने भरलेला ट्रॅक्टर जमा केलेला होता तो सोडविण्यासाठी पंचासमक्ष दिनांक २७/७/ २२ रोजी तक्रारदार याचेकडे ३५०००/= रूपयाची मागणी करून लाच स्विकारण्याचे मान्य केले होते .तसेच यातील आलोसे क्रं. २ याने आलोसे क्र. १ यास लाच घेण्याकामी प्रोत्साहीत हीत केले होते. म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर सापळा यशस्वी होण्यासाठी सापळा अधिकारी संदीप सांळुकें पोलीस निरीक्षक ला. प्र. वि. नशिक यांनी तर सापळा पथकात पो. ह. पंकज पळशीकर,पो. ना. प्रभाकर गवळी, वैभव देशमुख,पो. ह. संताेष गांगुर्डे सर्व नेमणूक ला.प. विभाग नाशिक यांनी सुनील कडासणे पोलीस अधिक्षक ला. प. वि. नाशिक परिक्षेत्र नाशिक नारायण न्याहळदे अप्पर पोलीस अधिक्षक नाशिक याच्या मार्गदर्शना खाली यशस्वी करण्यात आला.
दरम्यान महसुल विभागातील गौणखनिज विषयात पोलीसांचा वाढता हस्तक्षेप हा चर्चेचा विषय ठरत असून वाढत्या वाळू तस्करांवर कारवाई कोण करणार हा प्रश्न पुढे येत आहे.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.