Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – पिंपळगाव टोल नाक्यावर महिलांमध्ये फ्री स्टाईल

Sep 15, 2022

मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोल नाका कायमच चर्चेत असतो. काल ह्या टोल नाक्यावर कार्यरत महिला कर्मचारी आणि प्रवासी महिला यांच्यात तुफान हाणामारी झाली. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला असून सोशल मिडियात व्हायरल होत आहे. टोल नाक्यावर एक कार आली. ही कार एका पोलिसाची कार होती. या पोलिसाने त्याचे आयकार्ड दाखवून टोलमधून सूट देण्याची विनंती केली. मात्र, ती नाकारण्यात आली. त्यानंतर त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. वादाचे पर्यवसन भांडणात झाले. त्यानंतर टोल महिला कर्मचारी आणि पोलिस पत्नी यांच्यात हाणामारी झाली. आणि त्याचाच हा व्हिडिओ आहे. टोल वरील सुरक्षा रक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करुन हा वाद मिटवला आहे. पण, सध्या या व्हिडिओमुळे हा टोल नाका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

मनमाड - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड शहराच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असणार्‍या आणि व्रत अखंड वाचक...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]