नांदगाव सोमनाथ घोंगाणे
नांदगाव शहरातील जे. टी . कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

दिनांक 14 सप्टेंबर 2022 नांदगाव येथील जे. टी कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये हिंदी दिवस स्कूलचे प्राचार्य श्री. मनी चावला यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक हिंदी विषय शिक्षिका प्रियंका राजपूत यांनी केले. हा सप्ताह हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या सप्ताह अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी हिंदी दिवसाचे औचित्य सादत निबंध स्पर्धा, कविता गायन, वकृत्व स्पर्धा, समूह नृत्य नाट्यीकरण अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांची रूपरेषा आखली होती. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय छान असा भरभरून प्रतिसाद दिला. या स्पर्धेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून भेटवस्तू देण्यात आल्या. सहाय्यक शिक्षिका प्रियंका राजपूत यांनी ‘हिंदी भाषा देशाला जोडणारी भाषा आहे’ असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले तसेच ‘ देशात हिंदी भाषेचे महत्व आणि संस्कृतीतील योगदान’ या विषयावर शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सर्व विद्यार्थ्यांना हिंदी दिवसा निमित्त संस्थेचे चेअरमन मा. श्री सुनिलकुमारजी कासलीवाल तसेच संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा, जुगलकिशोर अग्रवाल, रिखबकाका कासलीवाल, महेंद्र भाऊ चांदीवाल,सर्व पदाधिकारी, प्रशासन अधिकारी पी. पी गुप्ता , प्रिन्सिपल मनी चावला सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.













