Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

रेल्वे खाली सापडून युवक मृत्युमुखी

Sep 17, 2022

मनमाड शहरापासून जवळ असलेल्या एकवई येथील २६ वर्षीय तरुणाचा लोहमार्ग ओलांडताना रेल्वेखाली सापडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी मनमाड – भुसावळ लोहमार्गावर घडली. या घटनेने एकवई गाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.या प्रकरणी मनमाड पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरापासून ४ किलोमिटर अंतरावर असलेल्या एकवई (ता.नांदगाव) येथील जनार्दन रामभाऊ बेदाडे,वय-२९ हा तरुण मनमाड येथे हमालीचे काम करीत होता.मात्र आज शुक्रवारी मनमाडहून दुपारी घरी जाताना गर्डर शॉप समोर असलेल्या मनमाड – भुसावळ लोहमार्ग ओलांडताना भरधाव वेगाने धावणाऱ्या रेल्वेने धडक दिल्याने हाता पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत होवून जागीच प्राण ज्योत माळवली. दरम्यान सदर मृत्यू पावलेला तरुण हा आई-वडिलांना एकुलता एक होता.तर त्यांची घरची परिस्थिती नाजूक असल्याने वडील आणि तो शहरात मिळेल ते काम करीत होते. असे बोलले जात असून त्याने परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.मात्र सर्वांशी मनमिळाऊ स्वभाव असलेल्या जनार्दनचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर दिव्यांग आघाडी  तर्फे सेवा पंधरवडा अंतर्गत दिव्यांग बांधवांना रुग्ण उपयोगी साहित्य वाटपा सह विविध सेवा कार्यक्रमा चे आयोजन

भाजपा मनमाड शहर दिव्यांग आघाडी तर्फे सेवा पंधरवडा अंतर्गत दिव्यांग बांधवांना रुग्ण उपयोगी साहित्य वाटपा सह विविध सेवा कार्यक्रमा चे आयोजन

भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे जन्म दिना निमित्त सध्या सेवा पंधरवडा सुरू आहे याच उपक्रमात...

read more
अंगणवाडी सातपुर विभाग नाशिक येथे अंकुर पालक मेळावा  हसत खेळत पुर्व शालेय शिक्षणाच्या माध्यमातुन बालकांचा साधला जात आहे  सर्वागिण विकास

अंगणवाडी सातपुर विभाग नाशिक येथे अंकुर पालक मेळावा हसत खेळत पुर्व शालेय शिक्षणाच्या माध्यमातुन बालकांचा साधला जात आहे सर्वागिण विकास

राष्ट्रीय पोषण २०२२ अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२ अंगणवाडी सातपुर...

read more
पोषण महा सप्टेंबर २०२२ अंतर्गतअंगणवाडी मातोश्री रमाबाईनगर आंबेडकर नगर नाशिक येथे पालक मेळावा आयोजित करण्यात आला.

पोषण महा सप्टेंबर २०२२ अंतर्गतअंगणवाडी मातोश्री रमाबाईनगर आंबेडकर नगर नाशिक येथे पालक मेळावा आयोजित करण्यात आला.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२. अंगणवाडी क्रमांक ३८ मातोश्री रमाबाई आंबेडकर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]